पीटीसी चेअरमन संजय वाघ यांच्या हस्ते विद्यमान – माजी मुख्याध्यापकांचा सत्कार
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. सु. गी. पाटील माध्यमिक विद्यालय व सौ. ज. ग. पूर्णपात्री जुनियर कॉलेज भडगाव येथे के. एस. पाटील यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या मुख्याध्यापक पदी ए. बी.अहिरे यांची मुख्याध्यापक पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच महात्मा फुले विद्यालय कुऱ्हाड येथील एस. एम. पाटील सेवानिवृत्त झाल्याने रिक्त झालेल्या पदावर जी. एन. पाटील यांची मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. सदरचे नियुक्ती आदेश संस्थेचे चेअरमन मा. नानासाहेब संजय वाघ यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक के एस पाटील व एस एम पाटील यांना देखील सेवानिवृत्तीच्या प्रयोजनार्थ सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी महात्मा फुले विद्यालय कुऱ्हाड चे शालेय समिती चेअरमन सतीष चौधरी, संचालक वासुदेव महाजन ,माजी मुख्याध्यापक विश्वासराव साळुंखे,एन. आर.ठाकरे उपस्थित होते. सदर नियुक्ती व सेवा निवृत्ती बाबत संस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार दिलीप वाघ, व्हाईस चेअरमन व्ही.टी. जोशी मानद सचिव ॲड.महेश देशमुख संस्थेचे संचालक यांनी अभिनंदन करून व शुभेच्छा दिल्या.