काश्मीर पहेलगाम घटनेचा आयडियल पत्रकार संघटना, व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे निषेध!

Ideal Journalists Association, Voice of Media condemn Kashmir Pahalgam incident!

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)-
काश्मीर खोऱ्यातील पहेलगाम बैसरन येथे पाकिस्तानने पोसलेल्या टीआरएफ दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी केलेल्या अमानुष गोळीबारात २८ निष्पाप भारतीय नागरिक ठार झाले. टीआरएफ दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांना आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानला केंद्र सरकारने कायमचा धडा शिकवावा. या घटनेचा आयडियल पत्रकार संघटना (दिल्ली) आणि व्हॉईस ऑफ मीडिया पाचोरा शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तसेच केंद्र सरकारने आता वाट न पाहता पाकिस्तान जगाच्या नकाशा वरून नष्ट करण्यासाठी व पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी पाकिस्तान वर हल्ला चढवावा. अश्या मागणीचे निवेदन पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे आणि पोलिस निरीक्षक अशोक पवार यांना दिले आहे.
या प्रसंगी आयडियल पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय संपर्कप्रमुख लक्ष्मण आबा सूर्यवंशी, व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार शेलकर, कार्याध्यक्ष राहुल महाजन, शहराध्यक्ष प्रविण बोरसे, उपशहराध्यक्ष प्रशांत येवले, शहर सहकार्याध्यक्ष नरसिंग भुरे, जेष्ठ पत्रकार दिलीप जैन, अनिल आबा येवले, व्हॉईस ऑफ मीडिया पदाधिकारी जावेद शेख, निखिल मोर, बंडू सोनार सह प्रिंट आणि सोशल मीडियाचे पत्रकार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button