काही दिवसांपासून धरणात नदीच्या पाण्यात बुडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून मागील काही दिवसांत अनेक घटना समोर आल्या आहेत

There has been an increase in drowning incidents in the dam for the past few days, and several incidents have come to light in the past few days.

कराड : विद्या मोरे कराडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. पोहायला शिकताना युवकाचा विहीरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

पोहायला शिकताना युवकाचा विहीरीत बुडून मृत्यू झाला. कोपर्डे हवेली, ता. कराड येथील चिमणकी नावच्या शिवारात शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तन्मय तेजस पापर्डेकर (वय 17, रा. शिवाजी स्टेडीयम पाठीमागे, जाधव वस्ती, कराड) असे बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत ओंकार अशोक शिंदे (रा. जाधव वस्ती, कराड) याने कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील जाधव वस्तीत राहणारा तन्मय पापर्डेकर हा युवक कोपर्डे हवेली गावच्या हद्दीत चिमणकी नावच्या शिवारात असलेल्या विहीरीत पोहोयला शिकण्यासाठी गेला होता. पोहायला शिकता यावे, यासाठी त्याने सोबत टायरची ट्युब नेली होती. सुरूवातीला त्याने ती ट्युब विहीरीच्या पाण्यात टाकली. त्यानंतर विहीरीच्या काठावरुन त्याने त्या ट्युबवर उडी घेतली. त्यावेळी त्या ट्युबमधून तन्मय विहीरीच्या खोल पाण्यात बुडाला. बराचवेळ तो पाण्यातून बाहेर आला नाही. त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. हवालदार तायशेटे तपास करीत आहेत.
कुटुंबावर शोककळा
यावेळी तन्मयसोबत असलेल्यांची भंबेरी उडाल्याने त्यांनी घर गाठत घडलेला प्रकार सांगितला. तातडीने गावकरी पोहचले आणि मृतदेह विहीरीबाहेर काढला. मात्र तन्मयच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. एकीकडे पोहण्याचा मोह तरुणांचा जीवावर बेतला आहे. सद्यस्थितीत ऊन वाढत असल्याने तरुण वर्ग दुपारच्या सुमारास विहिरी, धरणे, तलाव आदी ठिकाणी आंघोळीसाठी जात असल्याचे निदर्शनास येत आहे. याच दरम्यान अनुचित प्रकार घडत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button