भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक; 9 दहशतवादी तळ उद्धवस्त, ‘Operation Sindhoor’ दिलं नाव

India's air strike on Pakistan; 9 terrorist camps destroyed, named 'Operation Sindhoor'

कराड : विद्या मोरे

भारतानं पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. भारतीय सैन्यानं ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केलं आहे.
Operation Sindoor
भारताचा पाकिस्तानवर क्षेपणास् हल्ला.

Operation Sindoor : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terrorist Attack) भारतातील 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. भारताने या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली आहे. भारताने शेजारी देशासह सुरू असलेल्या या तणावादरम्यान बुधवारी मध्यरात्री (7 मे) पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत.

ऑपरेशन सिंदूर’ लॉन्च : पाकिस्तान विरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ लॉन्च केलं आहे. ही पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या बदल्याची सुरुवात आहे. भारताकडून पाकिस्तानात घुसून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

तिन्ही सैन्यदल प्रमुखांशी : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही सैन्यदल प्रमुखांशी सविस्तर चर्चा केली आहे. या चर्चेत ऑपरेशन सिंदूर, त्यानंतर पाकिस्तानकडून संभाव्य उत्तर आणि देशांतर्गत सुरक्षा व्यवस्था यासंदर्भात चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.

अनेक विमानं रद्द : ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियानं काही विमान उड्डाणं रद्द केली आहेत. त्यात जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगढ आणि राजकोट या ठिकाणी जाणारी व तिथून येणारी सर्व विमानं रद्द करण्यात आली आहेत. ७ मे रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत हे बदल करण्यात आले असून त्यानंतरच्या नियोजनाबाबत नंतर माहिती दिली जाईल, असं एअर इंडियाच्या अधिकृत सोशल अकाऊंटवर सांगण्यात आलं आहे.

India has launched a missile attack on Pakistan. The Indian Army has launched ‘Operation Sindoor’.
Operation Sindoor
India’s missile attack on Pakistan.

Operation Sindoor: 26 Indian tourists were killed in the terrorist attack in Pahalgam, Jammu and Kashmir on April 22. India has shown Pakistan their place in retaliation for this terrorist attack. India has fired missiles at 9 terrorist camps in Pakistan-occupied Kashmir on Wednesday midnight (May 7) amid the ongoing tension with its neighboring country.

Operation Sindoor’ launch: ‘Operation Sindoor’ has been launched against Pakistan. This is the beginning of revenge for the Pahalgam terrorist attack. A major operation has been taken by India by entering Pakistan.

With the three service chiefs: After ‘Operation Sindoor’, Indian Defense Minister Rajnath Singh has held detailed discussions with the three service chiefs. It is said that during this discussion, there was a discussion on Operation Sindoor, a possible response from Pakistan and internal security arrangements.

Several flights cancelled: In the wake of Operation Sindoor, Air India has cancelled some flights. In this, all flights to and from Jammu, Srinagar, Leh, Jodhpur, Amritsar, Bhuj, Jamnagar, Chandigarh and Rajkot have been cancelled. These changes have been made till 12 noon on May 7 and information about the subsequent planning will be given later, it has been said on the official social account of Air India.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button