एसएस. एमएम. महाविद्यालय आणि मास्टरलाईन इंडस्ट्रीज यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार

Educational MoU between SS. MM. College and Masterline Industries

(आबा सूर्यवंशी/महाराष्ट्र प्रतिनिधी)

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाने ‘NEP-2020’ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसाठी पदव्युत्तर एम. एस्सी (ऑरगॅनिक केमिस्ट्री) विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी ऑन जॉब ट्रेनिंग इंटर्नशिप प्रोग्रामसाठी मास्टरलाईन इंडस्ट्रीज लिमिटेड, भडगाव या कंपनीसोबत सामंजस्य करार केला.
भडगाव एमआयडीसीमधील मास्टरलाईन इंडस्ट्रीज लिमिटेड ही आघाडीची ऑइल ल्युब्रिकंट्स इंडस्ट्री आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, मास्टरलाईन ल्युब्रिकंट्स लिमिटेड यांचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. समीर जैन आणि मार्केटिंग डायरेक्टर श्री. सुयोग जैन यांनी शैक्षणिक सामंजस्य करारावर सह्या केल्या. या शैक्षणिक सामंजस्य कराराद्वारे मास्टरलाईन इंडस्ट्रीज ‘NEP-2020’ राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी कंपनीमध्ये ऑन जॉब ट्रेनिंग तसेच इंटर्नशिप व्यवस्था उपलब्ध करून देईल.
या कराराप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, श्री. समीर जैन यांनी वरिष्ठ महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना इंटर्नशिपमुळे निर्माण होणाऱ्या भविष्यातील संधी याविषयी अनमोल असे मार्गदर्शन केले. तर यावेळी त्याचे आभार प्रा. अतुल पाटील यांनी व्यक्त केले.
सदर करार यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील, रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. अतुल पाटील,प्रा.संदीप द्राक्षे, प्रा. शुभम राजपूत यांनी प्रयत्न केले.
काळाचे पाऊले ओळखून यशस्वी सामंजस्य करार अंमलबजावणी केल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. भाऊसाहेब दिलीप वाघ, चेअरमन मा. श्री. नानासाहेब संजय वाघ, मानद सचिव मा. श्री. दादासाहेब ॲड. महेश देशमुख, व्हा चेअरमन व कबचौउमविचे सिनेट सदस्य मा. श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी यांनी अभिनंदन आणि समाधान व्यक्त केले आहे.
सदर कराराप्रसंगी मास्टरलाईन ल्युब्रिकंट्स लिमिटेडचे श्री. संजय भंडारी, श्री मनोज महाजन तसेच महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्रा. अतुल पाटील, डॉ. शारदा शिरोळे,प्रा.संदीप द्राक्षे, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर प्रा. प्राजक्ता देशमुख, सौ. ज्योती जाधव, श्री. सुनील नवगिरे, श्री प्रसाद पाटील व रसायनशास्त्र विभागातील एम. एस्सी. चे (ऑरगॅनिक केमिस्ट्री) विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button