किशोर बारवकर यांची शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पदी निवड !,प्रामाणिक ,निष्ठावान कार्यकर्ता म्हणून बारावकरांची ओळख !!
Kishore Baravkar elected as Shiv Sena's Deputy District President! Baravkar is known as an honest and loyal worker!!
( आबा सूर्यवंशी /महाराष्ट्र प्रतिनिधी) –
पाचोरा येथील शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते किशोर बारवकर यांना पाचोरा शहरात आप्पा म्हणून ओळखतात त्यांनी तरुण वर्गांची फळी जमा करून तरुण कार्यकर्त्यांना घेऊन गेल्या शिवसेनेच्या स्थापने पासून कार्यरत आहेत.शिवसेनेचे शहर प्रमुखपदी असताना शहरात संपर्क ठेवून प्रत्येक नागरिकांच्या संपर्कात असून प्रत्येकाच्या सुखदुःखात प्रत्येकाच्या कामाच्या वेळी हजर असतात. पोलीस स्टेशन असो प्रांत कार्यालय असो तहसील कार्यालय नगरपालिका किंवा विविध क्षेत्रातील कुठलीही कार्य असो तत्परतेने करीत असतात. कुठलाही लाभ लोक न ठेवता आमदार किशोर आप्पा पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी नगरपालिकेचे सुकृत सदस्य नगरसेवक काम केले आहे. मागीलवर्षी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पदी निवड झाली होती. त्यांच्या उत्कृष्ट कामाची दखल पुन्हा वरिष्ठांनी त्यांची उपजिल्हाप्रमुख पदी फेर नियुक्ती केली आहे. पुन्हा एक सच्चा, रस्त्यावरचा कार्यकर्ता उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्त झाल्याबद्दल श्री.बारवकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.