पाचोरा शहरात पावसाळ्या पूर्वी नालेसफाई – स्वच्छता मोहीम

Pachora city monsoon eastern drain cleaning - Swachhata campaign

(आबा सूर्यवंशी/महाराष्ट्र प्रतिनिधी)

पाचोरा नगर परिषद आरोग्य विभागातर्फे जेसीबी च्या सहाय्याने मान्सून पूर्व नाले सफाईला रेल्वे उड्डाणपूल जवळ म्हसोबा मंदिर,स्टेट बँक कॉलनी ग. स. सोसायटी जवळ, बिस्मिल्ला नगर येथून नाले सफाईला सुरुवात करण्यात आली आहे. मुख्याधिकारी श्री मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग प्रमुख तुषार नकवाल, स्वच्छता निरीक्षक वीरेंद्र घारु यांच्या देखरेखीत नाले सफाई सुरू आहे. उर्वरित ठिकाणी देखील लवकर नाले सफाई करण्यात येईल. त्याच प्रमाणे येत्या काळात पावसाळा सुरु होतं असल्याने नागरिकांचे आरोग्य बाबतच्या समस्या लक्षात घेऊन साथीचे रोग पसरू नये म्हणून शहरातील श्रीराम चौक, जवाहर हौसिंग सोसायटी, बाहेर पुरा आदी भागातून सुरुवात करण्यात आली असून विविध भागात सूक्ष्म नियोजन करून फवारणी मोहीम करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे नागरिकांनी पाणी उकळून प्यावे असे आवाहन मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button