शिवसेनेत मतदारसंघातून १ लाख नविन सभासद जोडणार! आ.किशोरआप्पा पाटील,२५ मे रोजी तिरंगा रॅली!
Shiv Sena will add 1 lakh new members from the constituency! A.Kishor Appa Patil, Tricolor rally on May 25!
(आबा सूर्यवंशी /महाराष्ट्र प्रतिनिधी प्रतिनिधी)-
पाचोरा – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व युवा नेते श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा व भडगाव तालुक्यात नविन पदाधिकारी व सदस्यांच्या नुकत्याच नियुक्त्या करण्यात आल्या असून येत्या महिन्याभरात मतदार संघात १ लाख नविन सभासद नोंदणी करण्यात येणार असल्याचे आ. किशोर पाटील यांनी शिवसेनेच्या शिवालय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी प जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, उपजिल्हाप्रमुख किशोर बारावकर, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, प्रविण ब्राह्मणे, सुनिल पाटील, स्वीय सहाय्यक राजेश पाटील आदी उपस्थित होते.
मतदार संघात १ लाख नवीन सभासद नोंदणीचा संकल्प
आगामी काळात संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना त्यांच्या मतदार संघात पक्ष वाढीसाठी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व नविन सभासदांची नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने पाचोरा मतदार संघाचे आ. किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा व भडगाव शहर व तालुक्यात पदाधिकारी, सदस्य यांच्या नियुक्त्या नुकत्याच करण्यात आल्या आहेत. येत्या महिन्याभरात पाचोरा व भडगाव तालुक्यातुन १ लाख नविन सभासद नोंदणी केली जाणार असल्याचा संकल्प आमदारांनी केला आहे.
२५ मे रोजी पाचोऱ्यात तिरंगा रॅली
काश्मीर पहेलगाम खोऱ्यात पाकिस्तान समर्थक टीआरएफ आतंकवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी केलेल्या अमानुष गोळीबारात देशाच्या विविध भागातील हिंदू पर्यटकांवर अमानुष गोळीबार करण्यात आला त्यात २८ हिंदू भारतीय ठार झाले होते. या घटनेमुळे देशात आणि विदेशात प्रचंड संतापाची लाट उसळली होती. या घटनेचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आॅपरेशन सिंदुर लाॅन्च करून पाकिस्तान समर्थक अतिरेक्यांचे अड्डे उध्वस्त करण्याचे आदेश सैन्याला दिले भारतीय सैन्याने पाकिस्तान ला त्यांची जागा दाखवुन दिली आहे. आपल्या देशाचे जवानांचे शौर्य कौतुकास्पद असुन त्यांचे मनोबल अधिक मजबुत करण्यासाठी २५ मे रोजी पाचोरा शहरातुन सर्व पक्षीय व तमाम नागरिकांच्या उपस्थितीत भव्य अशी तिरंगा रॅली काढण्यात येणार असल्याचे आ. किशोर पाटील यांनी यावेळी सांगितले.