राहुल गांधीच्या तोंडाला काळे फासण्याची भाषा करणाऱ्यांची राहुल गांधींच्या जवळ जाण्याची पात्रता आहे का – भानुदास माळी
कराड : विद्या मोरे
नाशिक शिवसेना उबाठा गटाचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांनी राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून महाविकास आघाडी गेली खड्ड्यात आधी सावरकर आणि हिंदुत्व म्हणत राहुल गांधी नाशिक मध्ये आल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासू असे विधान दोन दिवसांपूर्वी केले होते यावरून महाविकास आघाडतील दोन प्रमुख पक्ष काँग्रेस आणि शिवसेना ( उबाठा )एकमेकांसमोर उभे ठाकले असून बाळा दराडे यांना काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी यांनी पत्रकार परिषद घेऊन चांगलेच सुनावले आहे.भानुदास माळी यांनी म्हटले की दराडे यांनी केलेली भाषा म्हणजे पोरांनी बापाच्या तोंडावर शेण फेकण्यासारखे आहे. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना महाविकास आघाडीचा कारभार सुरळीत चालावा असे वाटतं असेल तर आपल्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांच्या वर चिखलफेक करण्यापासून थांबवावे अन्यथा काँग्रेस कार्यकर्तेही काही कमी नाही. काँग्रेस हा चळवळीतून उभा राहिलेला पक्ष आहे त्यामुळे या अशा पोकळ धमक्यांना आम्ही भीक घालत नाही असे ही भानुदास माळी यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडी ही भाजपच्या खोट्या मानसिकतेला व देशविरोधी कृत्यांना गाडायला तयार झाली आहे त्यामुळे आपल्या नेत्यांविरोधात असे वक्तव्य करून काय साध्य होणार आहे त्यामुळे पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी अशी बेताल वक्तव्य करून आपसात टेड निर्माण करणाऱ्या कार्यकर्त्यांना आवर घालावा अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असेही महाराष्ट्र काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी यांनी म्हटले.