निगडी घोलपवाडी सोसायटीमध्ये परिवर्तन भाजपा विचाराच्या पॅनल चा विजय

कराड : विद्या मोरे
निगडी तालुका कराड येथील विकास सेवा सोसायटीमध्ये पंधरा वर्षानंतर सत्तातर होऊन प्रथमच भाजपा विचारचे पॅनलचा विजय झाला आहे. नवनिर्वाचित चेअरमन शरद घोलप,व्हाईस चेअरमन सुभाष घोलप
यांनी निवडून आलेल्या सदस्यांसह गावातील प्रमुख नेते व कार्यकर्त्यांसह आमदार मनोजदादा घोरपडे यांची भेट घेतली.
कराड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या निगडी गावांमध्ये विकास सेवा सोसायटीमध्ये सत्तांतर झाल्यामुळे भाजपाने सहकारांमध्ये आपली ताकत वाढवन्यास सुरुवात केलेली आहे.
यावेळी बोलताना आमदार म्हणून दादा घोरपडे म्हणाले गावातील विकासासाठी कधीही कमी पडणार नाही. मसूर विभागासाठी कोपर्डी लिंक कॅनॉल च्या माध्यमातून टाळी नदीचे पाणी व हंबरवाडी धनगरवाडी योजनेचे पाणी आल्यामुळे या विभागाचा दुष्काळ संपणार आहे. चालू वर्षी या विभागात कोणालाही उन्हाळ्याची तीव्रता जाणवली नाही इथून पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांचा दुष्काळ संपणार आहे.
यावेळी बोलताना चेअरमन शरद घोलप म्हणाले आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आम्ही सर्वजण भाजपच्या विचाराने काम करणार आहे. इथून पुढे विकासासाठी निधी हवा असल्यास तो आमदारांच्या माध्यमातून मिळणार आहे. आमदार मनोज घोरपडे यांचे कार्य निश्चितच चांगले झाले असून त्यांच्या विचाराला प्रयत्न होऊन आम्ही भाजपच्या विचारात आलेलो आहोत. यावेळी दिनकर आबा पाटील, रसिक आप्पा,संभाजी घोलप, गणेश कुंभार, शिवराज पाटील, पुनम कुंभार,विद्या पाटील, आनंदा चव्हाण, सागर हनुमंत घोलप, महेश पवार,रमेश पाटील, मोहन घोलप, शिवाजी घोलप, राजाराम घोलप,चंद्रकांत पाटील,आप्पासो माने,प्रशांत घोलप, मारुती पाटील,विलास गुरुजी,बापूराव माने,तानाजी घोलप, हनुमंत बाईंग, दादासो खापे,लक्ष्मण जाधव, दादासो घोलप, बापू घोलप, संतोष पोळ, अर्जुन गायकवाड, अरुण घोलप, हर्षद घोलप, चंद्रकांत घोलप, संजय पवार,अमोल पवार, शंकर जाधव, हरिभाऊ घोलप, पांडुरंग घोलप, उद्धव घोलप, शशिकांत घोलप, संतोष थोरवे, चंद्रकांत घोलप, संभाजी माने, भीमराव घोलप, आदी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button