दाखले मिळवताना सर्वसामान्य विद्यार्थी व पालकांना सेतू सुविधा केंद्रात होणाऱ्या असुविधा व अडचणी संदर्भात निवेदन
कराड : विद्या मोरे
अखिल भारतीय मराठा महासंघा सातारा जिल्हा च्या वतीने कराड च्या तहसीलदार सौ कल्पना ढवळे यांना शैक्षणिक वर्ष 2025-2026 सुरु होत असताना विविध दाखले मिळवताना सर्वसामान्य विद्यार्थी व पालकांना सेतू सुविधा केंद्रात होणाऱ्या असुविधा व अडचणी संदर्भात निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटलं आहे की, शैक्षणिक वर्ष 2025-2026 ची सुरुवात होत असताना विविध दाखले मिळवताना कराड तालुक्यातील सर्वसामान्य विद्यार्थी व पालकांना सेतू सुविधा केंद्रात अनंत अडचणींना समोरे जावे लागत आहे.
1) सर्वप्रकारच्या दाखल्यांची शुल्क आकारणी 100% पेक्षा जास्त आकारली जात आहे.
यापूर्वी सर्व दाखल्यांसाठी असणारे शुल्क ₹ 35 असताना आता ते ₹ 75 इतके आकारले जात आहे.
2) शुल्क आकारणीची कोणतीही पावती दिली जात नाही.
सर्वसामान्य विद्यार्थी व पालक आपले विविध दाखले काढण्यासाठी कराड तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात येत असतात. सदर दाखले काढण्यासाठी नियमबहाय्य पद्धतीने दुपटी पेक्षा जास्त शुल्क आकारून सुद्धा त्याची कसलीही पावती सेतू सुविधा केंद्रातून दिली जात नाही.
3) प्रतिज्ञापत्रासाठी सेतू केंद्रात सोय असताना देखील विद्यार्थी व पालकांना प्रतिज्ञापत्रासाठी सेतू सुविधा केंद्राच्या बाहेर जावे लागत आहे.
सदर प्रतिज्ञापत्रासाठी 250 ते 300 रुपये मोजावे लागत आहेत.
4) जात वैधता पडताळणी ची ऑनलाईन सुविधा सेतू केंद्रात नाही, ती सुविधा सेतू सुविधा केंद्रातून सुरु करावी.
5) दाखले मिळण्यासाठीचा विहीत कालावधी 8 दिवस ते 45 दिवस असताना विद्यार्थी व पालकांना तब्ब्ल 4/4 महिने दाखले मिळत नाहीत.
6) सेतू सुविधा केंद्रात एकाच पीसी वर सर्व दाखल्यांचे काम सुरु असल्यामुळे दाखले मिळण्यात अडचणी येत आहेत. सेतू सुविधा केंद्रातील पीसी ची संख्या वाढवण्यात यावी.
7) सेतू सुविधा केंद्र हे स्थानिकांच्या सह तहसील कार्यालयाच्या मार्फत चालवले जावे, कोणत्याही कंपनी ला सदर काम देण्यात येऊ नये.
वरील मागण्यांवर योग्य ती उपाय योजना केली गेली नाही तर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची राहील.
याची नोंद घ्यावी. असा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष श्री अनिल घराळ(बापू ) , जिल्हा सरचिटणीस विवेक कुराडे पाटील, जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील, जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील , सोशल मीडिया प्रमुख सुरज जाधव, कराड शहराध्यक्ष संदीप काळे , कराड दक्षिण अध्यक्ष युवराज कुराडे पाटील , कराड दक्षिण तालुका सचिव अमर पाटील, कराड दक्षिण तालुका उपाध्यक्ष विनोद पाटील, शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष तोहीद पटेल, जयवंत पाटील, विद्या मोरे, अर्चना जाधव, भास्कर थोरात,सुशांत इनामदार आदी पदाधिकारी उपस्थित होते.