भरडधान्य खरेदी केंद्राचे आ. किशोर पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
भरडज्वारी खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्यासाठी आमदारांना संघाचे निवेदन !
पाचोरा प्रतिनिधी *(आबा सूर्यवंशी)-२०२५-२६ राज्य शासनाच्या आधारभूत खरेदी योजनांतर्गत पाचोरा येथील शेतकरी सहकारी संघात दि.२ जून सोमवार रोजी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते भरड धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. सारोळा खूll.येथील शासकीय गोदामात खरेदी केंद्रावर प्रथम शेतकरी प्रकाश पाटील यांचा सन्मान झाला.
यंदाच्या वर्षात ज्वारीची खरेदी साठी८४४ शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून ५५०० क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट आहे. वाढीव खरेदी उद्दिष्ठ मिळावे म्हणून संघाचे चेअरमन सुनिल विठ्ठल पाटील यांनी शेतकरी पुत्र कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांना निवेदन दिले.
या प्रसंगी माजी आमदार दिलीप वाघ, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील,संघाचे चेअरमन सुनिल विठ्ठल पाटील, व्हा.चेअरमन नरेंद्र पाटील, संचालक तहसीलदार विजय बनसोडे, पुरवठा अधिकारी श्रीमती उरकडे , संघाचे संचालक प्रकाश निकुंभ, अनिल पाटील, शिवदास पाटील, मच्छिंद्र थोरात, दिपक पाटील , फकिरा चांभार, दीपक पाटील, संघाचे मॅनेजर प्रभाकर भावसार गोदाम मॅनेजर राठोड आदींची उपस्थिती होती.