Akola news:अकोट ग्रामीण पोलिसांची कार्यवाही मोटर सायकल चोरीचे गुन्हे करणारी टोळी 12 तासाचे आत जेरबंद
महराष्ट्र अकोला से मोहम्मद जुनैद की रिपोर्ट
दि. 07/07/2023 रोजी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नामे विजय शहादेव कसुरकार वय44 वर्ष राहणार ग्राम बोर्डी यांनी पो.स्टे.येथे जबानी रिपोर्ट दिला की त्यांची ग्राम बोर्डी आठवडी बाजार येथील बाजार जवळ उभी असलेली बजाज बाॅक्सर क्रं. एम. एच. 30- के. 5870 किं. अं. 20000/- रु ची गाडी ही आठवडी बाजार ग्राम बोर्डी ता. अकोट येथून कोणीतरी अज्ञात चोरट्यांने चोरून नेली आहे अशा फि चे जबानी रिपोर्ट वरून पो. स्टे. ला. अप. नं. 264/23 कलम 379 भादवि चा गुन्हा दाखल करून तपासात घेतला सदर गुन्ह्याचा तपास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी रितु खोखर मॅडम व मा.सुरज गुंजाळ सहायक परि. पोलीस अधीक्षक प्रभारी ठाणेदार पो. स्टे. अकोट ग्रामीण तसेच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू याचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार उमेशचंद्र सोळंके बक्कल नं. 03 तसेच पोउपनि विजय पंचबुधे ,सपोउपनि दादाराव निखार ब. नं. 621,पोहेका विलास मिसाळ ब. नं. 1137, पोहेका हरिष सोनोने ब न 1717 , नापोका योगेश जऊळकर बनं. 1611, पोका उमेश दुतोंडे ब. नं. 2242, पोका सागर नागे ब. नं.263 यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी यांचा तपासातून कसून शोध घेतला व आरोपी यांनी चोरून नेले्ली मोटर सायकल बजाज बाॅक्सर कंपनीची क्रं. एम. एच. 30- के. 5870 किंअं 20,000/- रु व या व्यतिरिक्त आणखी चोरलेल्या आठ मोटरसायकल व एक टीव्हीएस व्हिक्टर मो. सा. चे इंजिन असा एकुण नऊ मोटरसायकल व एक इंजिन असा एकुण 3,04000/- रुचा माल आरोपी नामे(1) रुपराव रामदास लासुरकर वय 44 वर्ष (2) गोपाल सुरेश अढाऊ वय 24वर्ष (3) गोपाल मनोहर सदाफळे वय 32 वर्ष तिन्ही राहणार ग्राम बेलखेड ता. तेल्हारा जिल्हा अकोला यांना ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याचा तपास12 तासाच्या आत उघडकीस आणलेला आहे.