विश्वास मोहिते यांना महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार 2025 जाहीर
कराड : विद्या मोरे
सातारा जिल्ह्यातील भारतीय संविधान ज्यांनी जागृतीच्या उद्देशाने काम करणाऱ्या महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ .प्रतिभाताई शेलार यांनी पाडळी केसे तालुका कराड येथील दैनिक क्रांतिकारी जयभिमचे पत्रकार संपादक श्री. विश्वास मोहिते यांची संविधानिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन यांना महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या वतीने भारतीय संविधान जनजागृती अभियाना अंतर्गत राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार 2025 जाहीर केला आहे. हा पुरस्कार सातारा शहरातील राजवाडा परिसरात पाठक हॉल येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत 22 जून रोजी सातारा येथे वितरण होणार आहे.सातारा येथील महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका सौ. प्रतिभाताई शेलार यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्तुत्ववान व्यक्तींना राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. या पुरस्कारामध्ये पाडळी केसे तालुका कराड येथील पत्रकार आणि दैनिक क्रांतिकारी जयभीम संपादक विश्वास मोहिते यांना त्यांच्या निर्भीड आणि अभ्यासपूर्ण लेखणीचा गौरव म्हणून या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.मच्छिंद्र सकटे, अध्यक्ष भानुदास माळी, आर.पी.आयचे सातारा जिल्हा सरचिटणीस समाज भूषण आप्पासाहेब गायकवाड,राष्ट्रीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे सातारा जिल्हाध्यक्ष संजय तडाके, दलित महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश वायदंडे, जान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जावेद नायकवडी, बहुजन समता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष रामभाऊ दाभाडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच चे राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब कांबळे , राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभागाचे पाटण तालुका अध्यक्ष सागर जाधव, भीम आर्मी सामाजिक संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आबासाहेब वाघमारे, राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार आणि स्वयंरोजगार संघटनेचे राज्य अध्यक्ष महारुद्र तिकुंडे,माय मराठी टीव्ही चॅनल च्या संपादिका मुस्कान तांबोळी, मालदन गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ.गीतांजली काळे, माजी उपसरपंच संदीप काळे, मालदन चे युवा नेते संजय चव्हाण सह विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.