डॉ अपूर्वा श्याम ढवळे यांना औषध निर्माण शास्त्रात डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी

Dr. Apurva Shyam Dhawale awarded Doctor of Philosophy degree in Pharmaceutical Sciences

पाचोरा प्रतिनिधी- ( आबा सूर्यवंशी)
पाचोरा येथील अपूर्वा ढवळे( साळुंखे ) हीने के एल ई अकॅडमी ऑफ हाईअर एज्युकेशन अँड रिसर्च बेंगलोर कर्नाटका युनिव्हर्सिटी मधून औषध निर्माण शास्त्रात डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी(पीएचडी) पदवी मिळवली आहे.
डॉ. अपूर्वा यांचे संशोधन परिधीय न्यूरोपॅथी (peripheral neuropathy) या विषयावर आधारित आहे. परिधीय न्यूरोपॅथी म्हणजे मेंदू आणि पाठीच्या कण्याबाहेरच्या (peripheral) नसांना होणारे नुकसान ज्यामुळे हात, पाय, आणि इतर भागांमध्ये सुन्नपणा, मुंग्या येणे, वेदना, आणि स्नायू कमजोर होणे अशी लक्षणे दिसून येतात.
डॉ. अपूर्वा यांनी अत्यंत कौशल्याने आणि अपार कष्ट करून तिचे स्वप्न पूर्ण केले. यामधे तिला तिचे पती राहुल साळुंखे, मुलगी, सासू , सासरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तिचे पती राहुल साळुंखे हे देखील उच्चशिक्षित असून त्यांनी Mtech आयआयटी (Roorkee) येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून सध्या टेक्सास इंस्ट्रुमेंट्स या नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीत कार्यरत आहेत. अपूर्वा ही पाचोरा येथील श्याम ढवळे पाचोरा नगरपरिषदेत कार्यरत असलेले श्याम ढवळे व ज्योती ढवळे यांची कन्या आहे. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत असून पाचोरा सारख्या लहान शहरातून मराठी माध्यमात शिकलेली एक ध्येयवादी मुलगी कठीण परिश्रम व जिद्दीच्या बळावर किती उत्तुंग अशी यशाची शिखरे पार करू शकते याचे उदाहरण म्हणजे डॉ. अपूर्वा श्याम ढवळे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button