एक छोटासा सेवा उपक्रम “एक पाऊल पुढे” पर्यावरण संवर्धन हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. याच औचित्याने, एन्व्हायरो प्लेट बँक नावाचा एक छोटासा उपक्रम विनामूल्य सुरू करण्यात आले
A small service initiative "One step ahead" Environmental conservation is a national duty. In this context, a small initiative called Enviro Plate Bank was started free of cost
.
कराड : विद्या मोरे
या उपक्रमामध्ये ए.आर.पवार यांनी 25 स्टीलच्या प्लेट्स (06 कंपार्टमेंट असलेले जेवणाचे ताट) 25 स्टीलचे ग्लासेस व 25 स्टीलचे चमचे खरेदी केलेले आहेत.
आपल्या घरी, मित्रांच्या घरी व इतर कोणतेही नातेवाईकांच्या घरी 25 माणसांच्यापर्यंत जर कोणताही छोटासा घरगुती कार्यक्रम असेल, जेवण असेल, नाश्तापाणी असेल किंवा बर्थ डे पार्टीचा कार्यक्रम असेल किंवा कोणताही असा छोटासा घरगुती कार्यक्रम असेल त्याकरीता त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या 25 स्टील प्लेट 25 स्टील ग्लास व 25 स्टीलचे चमचे हे सर्व साहित्य ते विनामूल्य उपलब्ध करून देत आहे. त्या साहित्याचा योग्य असा वापर करून पुन्हा सदरचे सर्व साहित्य स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून परत जमा करणेचे आहे. यासाठी कोणताही चार्ज आकारला जात नाही. ही सेवा पूर्णपणे *मोफत* आहे.
या उपक्रमाचा उद्देश असा आहे की, *Share to Save म्हणजे Share your resources to Save our mother earth (Zero Waste Party)* आपल्या कोणत्याही कार्यक्रमामधून सिंगल युज प्लास्टिकचा कचरा निर्माण होऊ नये व आपल्या पर्यावरणास कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू नये, तसेच प्लास्टिकच्या प्लेट मधील किंवा प्लास्टिकचा लेयर असलेल्या पत्रावळ्यामधील गरम अन्नामुळे प्लास्टिकचे मायक्रो कन पोटात जाऊन भविष्यात कोणत्याही प्रकारचा गंभीर आजार होऊ नये. याकरीता हा माझा छोटासा प्रयत्न आहे.
एन्व्हायरो फ्रेंड्स नेचर क्लबचा मोटो आहे की, *Think Globally, Act Locally & Do Personally* या उद्दिष्टाप्रमाणे माझा वैयक्तिक कृतिशील सहभाग म्हणून मी हा उपक्रम सुरू करीत आहे. या उपक्रमाची सुरुवात 5 जून जागतिक पर्यावरण दिनारोजी सुरू केलेली आहे.
उपक्रमशील कराडकर या अनोख्या संकल्पनेचे आवर्जून स्वागत करतील हा विश्वास आहे. या उपक्रमाचा आपण कराडकर नागरिकांनी लाभ घ्यावा व पर्यावरणाची होणारी हानी थोडीफार का होईना कमी करावी व आपले आरोग्य चांगले राहावे याची दक्षता घ्यावी अशी विनंती आहे. हा उपक्रम आपापल्या विभागात सुरू करावे अशीही ए आर पवार यांनी आवाहन केलेले आहे.