शिवसेना वर्धापन दिनानिमित्त वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात स्तुत्य उपक्रम
Commendable initiative led by Vaishalitai Suryavanshi on the occasion of Shiv Sena's anniversary
पाचोरा प्रतिनिधी – (आबा सूर्यवंशी)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा वर्धापनदिन निमित्त पक्षाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महादेव मंदिरात पूजन, अभिषेक आणि आरतीने करण्यात आली. त्यानंतर शिवसेना कार्यालय परिसरात ध्वजारोहण करून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. प्रसंगी मा. वैशालीताई सुर्यवंशी यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना सांगितले की,”आज शिवसेनेवर कठीण वेळ आहे. पण आपल्याला विसरता कामा नये की, संकटात सावरून उभे राहणे हीच खरी शिवसेना असून आज खऱ्या शिवसेनेचा वर्धापन दिन निष्ठावंत शिवसैनिक मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहे.
उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांचे खर्या अर्थाने जिवंत रूप आहेत. आज त्यांच्या सोबत उभं राहणं म्हणजे शिवसेनेच्या विचारांनाच बळ देणं आहे. म्हणूनच मी सर्व शिवसैनिकांना आणि जनतेला आवाहन करते की आपण सर्वजण एकजुटीने उद्धव साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहूया. या विशेष दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळांना नोटीस बोर्ड भेट देण्याचा एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला. उपक्रमाची सुरुवात पाचोरा शहरातील कृष्णराव नगर, सिंधी कॉलनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच भडगाव येथील जय हिंद कॉलनी, टोणगाव, भडगाव येथील शाळांना नोटीस बोर्ड प्रदान करून करण्यात आली. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी ठोस पाऊल उचलण्यात आले. या उपक्रमामुळे समाजसेवेचे आणि शिक्षणप्रेमाचे सुंदर दर्शन घडले. वर्धापन दिनाचे औचित्य साधून उचललेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे. याप्रसंगी ॲड. अभय पाटील, माजी नगरसेविका योजनाताई पाटील, मनीषा पाटील, द्वारकाबाई सोनवणे, अनिल सावंत, शशिकांत पाटील, मनोज चौधरी, अभिषेक खंडेलवाल, हरीश देवरे, खंडू सोनवणे, चेतन पाटील, माधव जगताप, भैया भाऊ सूर्यवंशी, रतन परदेशी, विजय साळुंखे, राजू चव्हाण, अरुण तांबे, ज्ञानेश्वर चौधरी, सिकंदर तडवी, गजू पाटील, रमेश पाटील, मिथुन वाघ, पंढरी पाटील, एकनाथ महाराज, संजय चौधरी, राजधर आबा, गोविंद पाटील, अकिल शेख, सलीम खान, नितीन महाजन, आवेश खान, नामदेव चौधरी, चेतन पाटील,आवेश खाटीक, अजय तेली, निकित पाटील,आणि अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.