कराड न्यायालाय येथील अनेक अडचणी आल्या समोर ; याबाबत कराड बार चे अध्यक्ष ऍड दीपक थोरात यांनी केल्या महत्वाच्या मागण्या

कराड विद्या मोरे
कराड कोर्टातील अनेक अडचणी आहेत ज्या PWD डिपार्टमेंट कडूनच सोडवल्या जातात… या कारणासत्व अनेक वर्षांच्या पासून प्रलंबित असणारे अनेक अडचणी जुन्या इमारतीचा स्लॅब गळणे, जुन्या इमारतीचा पत्रा गळून बैठक व्यवस्था आणि कागदपत्रे खराब होणे, वकील बार रूमचा पत्रा गळतोय तें पत्रे बदलणे तसेच त्यामुळे खराब झालेले पीओपी बदलणे, आणि पार्किंग व्यवस्थेसाठी PWD ने विशेष प्रयत्न करून पार्किंगचे बांधकाम व्यवस्थित करून देणे गरजेचे आहे या सर्व अडचणी सोडवण्यासाठी तसेच सर्वात महत्त्वाची एक अडचण म्हणजे 2014 रोजी नवीन बिल्डिंग झाल्यापासून जूनियर्स आणि सीनियर्स वकिलांना बसण्यासाठी जागा न मिळणे, अनेक वकिलांच्या बैठक व्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी नवीन दोन शेड तयार करणे आणि बांधणे गरजेचे आहे..
या सर्व बाबींचे पाहणी करण्याकरिता कराड तालुका PWD चे अधिकारी मा. अक्षय देसाई साहेब यांनी कराड बार असोसिएशनचा अध्यक्ष Adv दीपक थोरात यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या सर्व टीम सहित अप्पर जिल्हा व सत्र न्यायालय कराड येथे भेट दिली आणि सर्व समस्या जाणून घेतल्या…
PWD अधिकारी देसाई साहेब यांना सर्व अडचणी सोडवण्याच्या संदर्भात विनंती केली आणि PWD कर्मचाऱ्यांना उपलब्ध निधीमध्ये त्वरित स्लॅब गळती आणि पत्रा गळतीचे काम त्वरित चालू करण्याच्या सूचना अध्यक्ष Adv दीपक थोरात यांनी दिल्या…
त्याचबरोबर नवीन शेड साठी आणि पार्किंग साठी चे काम करण्यासाठी इस्टिमेट तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या… आणि अधिकारी देसाई साहेबांना अध्यक्ष म्हणून Law Minstry आणि PWD Minstry कडून निधी उपलब्ध करून देण्याचा आश्वासक कराड बार चे अध्यक्ष Adv दीपक थोरात यांनी शब्द दिला…

सोबत Adv विशाल शेजवळ, Adv नितीन पाटील, Adv अनिल माळी Adv मछिंद्र पवार, Adv अजिंक्य डुबल, Adv ऋषिकेश यादव, Adv बाळासाहेब गरुड, इ आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button