पाचोरा तालुक्यात भाजपची सत्तर हजार सदस्य नोंदणी करणार ! दिलिप वाघ
आगामी काळातील सर्व निवडणुका जिंकून मतदार संघ काबीज करणार?
पाचोरा प्रतिनिधी (आबा सूर्यवंशी )-
माजी आमदार दिलीप वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ला राम राम ठोकत नुकतेच भारतीय जनता पक्षाचे कमळ हाती घेतले आहे. जय श्रीराम चा जयघोष करीत ते मतदार संघाच्या दोन्ही तालुक्यात भाजपा पक्ष मजबूत करण्यासाठी भाजपचे मूळ पदाधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते यांना सोबत घेऊन आगामी काळातील सर्व निवडणुका जिंकण्यासाठी मैदानात उतरले आहेत. प्रसार माध्यमांशी संवादात ते म्हणाले की, या पुढे होणाऱ्या सर्व निवडणुका जिंकून मतदार संघ काबीज करणार आहोत, सोबतच मतदार संघात भाजपाचे ध्येय, धोरणांवर काम करणार असून पाचोरा शहरात आणि तालुक्यात टप्पे टप्प्यात सत्तर हजार भाजपा सदस्य नोंदणी करणार असल्याचा संकल्प माजी आमदारांनी दि.२१ जून शनिवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात योग दिना निमित्त भाजपा सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात करतांना बोलून दाखविला.
या प्रसंगी भाजपाचे प्रमुख पदाधिकारी मधुकर काटे, सुभाष मुंढे पाटील,रमेश वाणी, डॉ.शांतीलाल तेली, नंदू सोमवंशी, वाघ गटाचे पिटीसी चेअरमन संजय वाघ, सौ.सुचेता वाघ, सौ. ज्योती वाघ, सरला पाटील, वैशाली जडे ,अन्य महिला कार्यकर्त्या , प्रदीप पाटील, सतीश चौधरी,रणजीत पाटील, प्रकाश पाटील, वासु महाजन, सुदाम वाघ, हरून देशमुख, सह पिटीसी शिक्षण संस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येत नोंदणी अभियानाला उपस्थित होते.या नोंदणी अभियानात भाजपाच्या एका फळीतील काही माजी पदाधिकारी व कार्यकर्ते ? यांची उपस्थिती दिसून आली नाही.