मलकापूर चे काँग्रेस पक्षाचे नेते मनोहर शिंदे भाजप किंवा सेनेत जाणार का?…

कराडच्या पत्रकार परिषदेत मनोहर भाऊ झाले निरुत्तर...

कराड : विद्या मोरे
सातारा जिल्ह्यात काँग्रेस ची काहीप्रमाणात पडझड झाली आहे याची कबुली देत यापुढे जिल्ह्यात काँग्रेस बळकट करणार असल्याचे नवनिर्वाचित काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष रणजित देशमुख यांनी सांगितले
दरम्यान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे भाजप किंवा शिवसेनेत जाणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना रणजित देशमुख म्हणाले ते कुठेही जाणार नाहीत…ते काँग्रेसमध्ये च राहणार आहेत…अफवांवर विश्वास ठेवू नका…
याबाबत स्वतः मनोहर शिंदेंना यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी काहीच उत्तर दिले नाही…यावरून ते आता काही दिवसच काँग्रेसमध्ये दिसतील अशी चर्चा सुरू झाली आहे… यावेळी मनोहर शिंदे यांना पत्रकार म्हणाले याविषयावर भाऊ तुम्ही बोला की, त्यावेळी भाऊंनी मौन बाळगले पण ठामपणे आपण काँग्रेसमध्येच राहणार असे सांगितले नाही…त्यांनी फक्त हातानी खूण करून इथेच आहे…असे सांगितले त्यानंतर पत्रकार मनोहर भाऊंना म्हणाले… इथे म्हणजे आतातरी इथे आहे… उद्या कुठे जाणार हे माहीत नाही असा अर्थ घ्यायचा का? त्यावेळी भाऊंनी मौन बाळगून वेळ मारून नेली पण उत्तर दिले नाही…

दरम्यान यावेळी रणजित देशमुख जिल्ह्याचे अध्यक्ष झाल्यानंतर आज त्यांनी कराडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली
ते म्हणाले सातारा जिल्हा कोग्रेसचा बालेकिल्ला होता तेच दिवस पुन्हा काँग्रेसला आणण्यासाठी जिल्ह्यात पक्षाची बांधणी करून पक्ष मजबूत करणार आहे
जिल्ह्यातील होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका काँग्रेस पक्षचिन्हावर लढणार असून महाआघाडी करण्यासाठी आवश्यक तेथे चर्चा करून निर्णय घेणार आहोत

दरम्यान तालुक्यात मनोहर शिंदे हे भाजप-किंवा सेनेत जाणार अशी चर्चा सुरू आहे त्याबाबत मनोहर शिंदे यांनी कोणतेच उत्तर दिले नाही…मी दुसऱ्या पक्षात जाणार नाही…मी काँग्रेसमध्येच राहणार…असेही ठामपणे म्हणाले नाहीत…आणि भाजप किंवा सेनेत जाणार असेही म्हटले नाहीत म्हणून
यावेळी मनोहर शिंदे यांना पत्रकार म्हणाले, भाऊ तुम्ही यावर काहीतरी स्वतः बोला मात्र त्यावेळी भाऊंनी मौन बाळगले पण ठामपणे आपण काँग्रेसमध्येच राहणार असे सांगितले नाही…त्यांनी फक्त हातानी खूण करून इथेच आहे…असे सांगितले त्यानंतर पत्रकारांनी इथे म्हणजे आतातरी इथे आहे…मात्र उद्या कुठे जाणार हे माहीत नाही असा अर्थ घ्यायचा का? त्यावेळी भाऊंनी मौन बाळगले.
त्यामुळे मनोहर शिंदे यांच्या काँग्रेस सोडण्याच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button