लोकसेवा ब्लड डोनर ग्रुपचे कार्य कौतुकास्पद – रिद्धी सांतूरकर
कराड : विद्या मोरे
कोणताही मोबदला न घेता गरजु रुग्णांना रक्त मिळावे यासाठी सातत्या ने प्रयत्न करत असलेल्या लोकसेवा ब्लड डोनर ग्रुपचे कार्य कौतुकास्पद आहे असे मत रिद्धी सांतूरकर यांनी व्यक्त केले. त्या कराड येथील आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. तसेच पुढे त्यांनी सांगितले की, माहितीचं स्वरूप ज्ञानात आणि ज्ञानाचं स्वरूप कृतीत उतरवता आलं पाहिजे आणि ती सकारात्मक कृती लोकसेवा करीत आहे त्याबद्दल सर्वांचे नक्कीच कौतुक व्हायला पाहिजे. लोकसेवा अध्यक्ष पैलवान अक्षय सुर्वे यांनी लोकसेवा तर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा जयश्री गुरव,ॲड.परवेज यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी अशोक मोहने, जयप्रकाश रसाळ,ॲड.परवेज सुतार, अभिजीत हाफसे, दीपक म्होप्रेकर, प्रकाश वायदंडे, शंभूराज भोसले , महेंद्र शेवाळे, विश्वास जाधव, पै.यशवंत थोरात, पै.श्रीकांत मेडशिंगे, शनिकुमार वाघमारे, रमाकांत घोरपडे, राज भुजंगे, कुणाल शहा, कुणाल आडसुळे, सुरज अवधूत, प्रभंजन मोहोळकर, जावेद मुलानी, तन्मय हापसे, संदेश सराटे उपस्थित होते.