अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा विभागीय मेळावा कराड येथे उत्साहात आणि दिमाखात संपन्न
कराड : विद्या मोरे
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा विभागीय मेळावा व नियुक्ती समारंभ, तसेच नव उद्योजक सत्कार समारंभ, कराड येथील संगम हॉटेलच्या भव्य बँक्वेट हॉलमध्ये मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला.
महाराष्ट्र प्रदेशाच्या उपाध्यक्ष सौ .सोनल भोसेकर यांनी या परिषदेचे आयोजन केले होते…
या विशेष कार्यक्रमासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व राज्यमंत्री दर्जाचे मा. कॅ. आशिष दामले, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. निखिल लातूरकर आणि चितळे उद्योगसमूहाचे मा. गिरीश चितळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या एकदिवसीय मेळाव्याला सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सहा जिल्ह्यांतून अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी महासंघाने 2025 ते 2027 हे “उद्योजकता वर्ष” म्हणून घोषित केले असून, ‘नव उद्योजक’ उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रातील यशस्वी उद्योजकांचा गौरव करण्यात आला.
सन्मानित उद्योजकांमध्ये अमित बुधकर , रजत शर्मा, किरण भोसेकर, अभिजीत चाफेकर, सौ मंजिरी काणे. शार्दूल चरेगावकर, योगेश टोणपे सौ पूजा कुलकर्णी.,यांचा समावेश होता. याशिवाय, नौदलासाठी एअर कंडिशनिंग उपकरणांची निर्मिती करणारे कराडचे प्रख्यात उद्योजक मा. रवळनाथ शेंडे (श्री रेफ्रिजरेशन) यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा.सौ. सोनल भोसेकर यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी संघटनेची कार्यप्रणाली आणि मूल्यधारा याचे प्रभावी सादरीकरण करत , संघटनेतील प्रत्येकाचे कार्य समजावून सांगितले.
राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले की, महासंघ आज २२ राज्यांत कार्यरत असून ३३ आघाड्यांच्या माध्यमातून समाजात कार्य करत आहे. पुढील तीन वर्षांत एक लाख ब्राह्मण तरुण उद्योजक घडवण्याचे ध्येय संघटनेने ठरवले आहे. त्याचप्रमाणे विविध राज्यातील मोठ्या शहरांमध्ये ब्राह्मण भवनची निर्मिती करणार असल्याचे सांगितले. तेच दिल्ली येथे करून बाग मध्ये तीन मजली सुसज्ज ब्राह्मण भवन निर्माण झाले असून समाजातील स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना राहण्याची व भोजनाची या ठिकाणी सोय करून देण्यात आली आहे.. आपल्या संस्कृती व परंपरा जपत राष्ट्रसंवर्धनासाठी समाजाने काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले..
प्रदेशाध्यक्ष मा. निखिल लातूरकर यांनी ब्राह्मण समाजाची सकारात्मक कार्यपद्धती आणि संघटनेतील ऊर्जा यावर प्रकाश टाकला. व कॅ. आशिष दामले यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या कार्याचा आढावा देत पुरोहितांच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या योजना, प्रशिक्षण व ठिकठिकाणी परशुराम भवन निर्मितीचा संकल्प मांडला. परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे एक आदर्श महामंडळ ठरेल हा विश्वास त्यांनी व्यक्त केला..
सत्कारमूर्ती मा. रवळनाथ शेंडे यांनी समाजाने उद्योगाच्या दिशेने एकत्र येण्याचे आवाहन केले. समाजाची मानसिकता बदलून स्वतःचा विकास साधणं हे उद्योगातून शक्य आहे, असे ते म्हणाले. श्री .गिरीश चितळे यांनी ग्रामीण भागातील युवकांसाठी असलेल्या उद्योगसंधीवर प्रकाश टाकत सातत्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमात सुरेश काणे, महेश सप्रे, मंगेश ठाणेदार, विवेक जोशी, उदय बापट आणि प्रमोद गोसावी यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हा सचिवांनाही नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली..
दुसऱ्या सत्रात झालेल्या ओपन फोरममध्ये श्री.श्याम जोशी, श्री.बापूसाहेब चिवटे, कौसडीकर, सौ.मोहिनी पत्की, राम तडवळकर, उदय महा, किशोर पाठक आदी पदाधिकाऱ्यांनी प्रश्नोत्तरांच्या सत्रात भाग घेतला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंत बेडेकर.पराग बोडस, गणेश बापट, जुगलकिशोर ओझा, अमित बुधकर, योगेश टोणपे, निलेश कुमठेकर,सुजित कुलकर्णी,उदय कुलकर्णी सौ.शरयू माटे, सौ . मैत्रेयी कुलकर्णी, सौ.संयोगिता कामतकर, अश्विन काळे, हेमंत पानसकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
श्री बोडस व सौ कविता कुलकर्णी यांनी आभार मानले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वर्षा देशपांडे आणि डॉ. कोमल कुंदप यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले.