कराडच्या वाढीव भागात १९४ कोटींचे रस्ते प्रस्तावित,राजेंद्रसिंह यादव यांची माहिती; दौलत, रेव्हिन्यू कॉलनीत फेज टू कामांचा शुभारंभ

कराड : विद्या मोरे

कराड शहराच्या हद्दवाढ झालेल्या भागाच्या विकासाचा एकही प्रश्न आगामी काळात शिल्लक ठेवणार नाही. पाणी पुरवठा, भुयारी गटार योजनेसह सुमारे १९४ कोटी रुपयांचे काँक्रीटचे रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. या भागाचा विकास करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते राजेंद्रसिंह यादव यांनी केले.

कराड शहर वाढीव भागामध्ये असणारी ड्रेनेज लाईनची समस्या लक्षात घेऊन शिवसेना नेते व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी लक्ष घालून दौलत आणि रेव्हीन्यू कॉलनी येथे भुयारी गटार योजनेच्या फेज २ कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
राजेंद्रसिंह यादव म्हणाले की, शहराच्या हद्दवाढ भागात घरे अगोदर झाली. नंतर मागणीप्रमाणे मुलभूत सुविधा होत आहेत. मात्र यात एकसुत्रीपणा नसल्याने पाणी पुरवठा व ड्रेनेजच्या तक्रारी निर्माण झाल्या आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून कराडला ३२५ कोटींचा निधी निधी मंजूर झाला आहे. यात सुमारे दोनशे कोटी हद्दवाढ भागासाठी आहेत. त्यामुळे या भागाचा भविष्यात कायापालट होणार आहे.
हद्दवाढ भागात घनकचरा प्रकल्पाशेजारी अकरा लाख लीटरची पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. त्यामुळे कमी दाबाने पाण्याची समस्या संपुष्टात येईल. हद्दवाढ भागात १९४ कोटींचे रस्ते प्रस्तावित केले आहेत. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटार असणार आहेत. २०५६ साली शहराची लोकसंख्या गृहीत धरून पाणी योजना, भुयारी गटार योजनेची कामे होणार आहेत. त्यामुळे या भागात वेगाने नागरीकरण होईल, असेही राजेंद्रसिंह यादव यांनी सांगितले.
यावेळी माजी नगरसेवक निशांत ढेकळे, सामाजिक कार्यकर्ते शिवराज इंगवले, विनोद भोसले, अनिस भालदार, निशांत ढेकळे,प्रवीण पवार, मुसा मुजावर,फैजल बागवान, इस्माईल मुल्ला, कादर नाईकवाडी,टिपू मुल्ला,गाडे सर, कांबळे साहेब,आसिफ शेख,शाहरुख मुल्ला,समीर दिवाण, रियाज मोमीन,अयान शेख, सैफ मुजावर, विक्रम मोहिते,अदनान शेख, व इतर मान्यवर नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button