ज्वेलरी व्यवसायात रोहिंग्यांची घुसखोरी !,राज्य सुवर्णकार वेल्फेअर असो.च्या वतीने पोलिस अधीक्षकांना निवेदन !
*ज्वेलरी व्यवसायात रोहिंग्यांची घुसखोरी !,राज्य सुवर्णकार वेल्फेअर असो.च्या वतीने पोलिस अधीक्षकांना निवेदन !
पाचोरा प्रतिनिधी *(आबा सूर्यवंशी)* ज्वेलरी क्षेत्रात बांगलादेशी रोहिंग्यांची मोठ्या प्रमाणात घुसखोरी वाढली आहे. सुवर्णकार व्यावसायिकांसाठी हि बाब चिंताजनक असून ज्वेलरी व्यसायांवर परिणाम करणारी आहे. तसेच रोहिंग्यांच्या बेकायदेशीर घुसखोरीमुळे राज्यात, जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असून भविष्यात काहीही विपरीत घटना घडण्याच्या शक्यता असून ज्वेलरी व्यवसायात घुसखोरी करणाऱ्या रोहिंग्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून पारंपरिक सोने , चांदीचा व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना न्याय द्यावा. अश्या मागणीचे निवेदन जळगांव जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना महाराष्ट्र राज्य वेल्फेअर सुवर्णकार कारागीर असोशिएन तर्फे देण्यात आले आहे.
निवेदन देतांना राज्याचे उपाध्यक्ष किरण देवरे, राज्यसचिव दीपक भामरे, राज्य सदस्य निखिल पिंपळगावकर, जळगाव जिल्हाध्यक्ष समाधान भालेराव, पाचोरा तालुकाध्यक्ष
कमलेश बाविस्कर, उपाध्यक्ष राजेंद्र चिंधू शेठ सोनार, अनिल कोटमगावकर, गोलू शेठ सराफ, दीपक विसपुते यांचे सह जळगाव जिल्हा असोसिएशनचे सदस्य तसेच इतर तालुक्यातून आलेले सुवर्ण पेढी चालक उपस्थित होते.