राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त कराडमध्ये शालेय विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप

कराड : विद्या मोरे
राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जनहिताय फाउंडेशनच्या वतीने कराड नगरपरिषदेच्या शाखा क्रमांक ९ येथे विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचे आयोजन जनहिताय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाला कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तशिलदार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना मुंडेकर मॅडम यांनी तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार शाळेचे मुख्याध्यापक अरविंद पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी जनहिताय फाउंडेशनच्या काही नवीन पदाधिकाऱ्यांची निवड देखील करण्यात आली. सामाजिक भान जपत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत समाजप्रबोधनाचे कार्य या माध्यमातून करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button