स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज शनिवारी शिवसेनेचा निर्धार मेळावा

Shiv Sena's Nirdhar rally today, Saturday, in the backdrop of local body elections

पाचोरा प्रतिनिधी -(आबा सूर्यवंशी)

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा तालुका शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटनेच्य वतीने मा.कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांचे प्रमुख मार्गदर्शनात दि. २८ जून शनिवार रोजी प्रसाद हॉल येथे सकाळी १० वाजता शिवसेनेचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शिवसेनेचे सर्व अंगीकृत संघटनाचे प्रमुख पदाधिकारी, यांचेसह पाचोरा शहरातील व तालुक्यातील सर्व शिवसेना- युवासेना,महिला आघाडी व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, सभापती, उपसभापती व संचालक मंडळ कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा-भडगाव, व्हॉ.चेअरमन, संचालक मंडळ शेतकी संघ पाचोरा आजी- माजी नगराध्यक्ष. उपनगराध्यक्ष , नगरसेवक, न.पा पाचोरा ग्राम पंचायतीचे सरपंच व सदस्य, वि.का सोसायटीचे चेअरमन, व्हाँ. चेअरमन व संचालक मंडळ तसेच शाखाप्रमुख,उपशाखा प्रमुख, बुथप्रमुख, शिवदुत व शिवसैनिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील , उपजिल्हाप्रमुख किशोर बारावकर, स्विय सहाय्यक राजेश पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button