राष्ट्रीयकृत बँकांनी बचत गटांना कमी व्याज दराने अर्थ सहाय्य करावे:आ. किशोर पाटील
प्रोडक्ट मार्केटिंगसाठी दीड कोटीच्या मार्टला मंजुरी !,शहर हरीत आणि स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करा !मुख्याधिकारी श्री.देवरे
पाचोरा प्रतिनिधी – (आबा सूर्यवंशी)
पाचोरा नगर परिषदेच्या वतीने दि.३० सोमवार रोजी सकाळी ११ वाजता सारोळा रोड वरील समर्थ मंगल कार्यालयात दीनदयाल अंत्योदय योजनांतर्गत राष्टीय नागरी उपजीविका अभियान व्यवस्थापन तर्फे महिला बचत गटाचे आयोजन कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आले. या वेळी माजी नगराध्यक्षा सौ.सुनीताताई पाटील, जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, बाजार समिती सभापती गणेश पाटील, उपप्रांताधिकारी भूषण अहिरे, मुख्याधिकारी मंगेश देवरे, जिल्हा प्रमुख किशोर बारावकर, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, तालुका प्रमुख विनोद तावडे, राजेंद्र पाटील, भीमशक्ति जिल्हा प्रमुख प्रविण ब्राह्मणे, महिला आघाडीच्या ललिता पाटील, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता, माँ साहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमांचे पूजन, दिप प्रज्वलन आणि महाराष्ट्र गीताने करण्यात आली. कार्यक्रमात आलेल्या बचत गटांच्या महिलांना आर्थिक व व्यावसायिक मार्गदर्शन करण्यासाठी बचत गट चालवून अनुभवातून आर्थिक सक्षम आणि यशस्वी झालेल्या महिलांनि सखोल मार्गदर्शन केले.
शहर हरीत व स्वच्छ ठेवा
मुख्याधिकारी.प्रास्ताविकात मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी कार्यक्रमाचा मूळ उद्देश आणि महिला बचत गटाच्या महिलांसाठी राज्य व केंद्र सरकारच्या वतीने विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना राष्ट्रीयकृत बँकाचे मार्फत व्यावसायिक कर्ज, प्रॉडक्ट निर्मिती साठी मशिनरी उपलब्धता , आर्थिक सहायता, महिला बचत गटांना कामांची जबाबदारी, बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित विविध प्रॉडक्ट ची ऑनलाइन मार्केटिंग, तसेच पंतप्रधान मोदींनी देश हरित क्रांती कडे नेण्यासाठी घरोघरी एक वृक्ष लावून त्याचे वर्षभर संगोपनची जबाबदारी बचत गटांच्या महिलांनी केल्यास मिळणारे अनुदान आणि अन्य महत्वाच्या कामांचे बाबत माहिती दिली. शहर हरीत आणि स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.अध्यक्षीय भाषणात किशोरआप्पा पाटील यांनी नगर पालिकेने महिला सक्षमीकरण साठी आयोजित कार्यक्रमाचे कौतुक आणि अपेक्षेपेक्षा प्रचंड संख्येत उपस्थित महिलांचे आभार मानले.महिला सक्षमीकरण काळाची गरज आहे. महिलांमध्ये काम करण्याची क्षमता, घेतलेले कर्ज फेडण्याची हिंमत असल्याने पाचोरा तालुक्यातील एकही बचत गट थकित नसल्याने बँका बचत गटांना चस्वतः हुन कर्ज देण्यासाठी उस्तुक आहे. पाचोरा शहरात सुमारे ३६० बचत गटांच्या माध्यमातून ३०६० महिला लाभ घेत आहे. तालुक्याची आणि शहराची लोकसंख्या पाहता बचत गटांच्या संख्या पुरेशी नसून येण्याच्या सहा आठ महिन्यात पाचशे झाली पाहिजे. सरकारच्या धोरणा नुसार राष्ट्रीयकृत बँकांनी बचत गटांच्या अडीच कोटी नव्हे तर दहा ते पंधरा कोटी अर्थसहाय्य १० ते ११ टक्क्यांनी न देता ९ टक्क्यांनी द्यावे देण्याचा सल्ला दिला.राज्य आणि केंद्र सरकार महिला सक्षमीकरण साठी अनेक लाभदायी योजना राबवित आहे.शिवसेना नेते, उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांनी युती सरकार नारीशक्तीला सक्षम करण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेऊन स्त्री शक्तीचा खरा सन्मान केला. बचत गटांच्या माध्यमातून अनेक व्यावसायिक प्रकल्प राबविण्यासाठी राज्य व केंद्र सरकार महिलांच्या पाठीशी आहे. आणि मी जो पर्यंत आमदार आहे तो पर्यंत बचत गटांना पैसा कमी पडू देणार नाही.
बचत गटांच्या साठी “बहिणाबाई चौधरी “दीड कोटींचा मार्केटिंग मार्ट
बचत गटांच्या उत्पादित मालाला लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि त्याची मार्केटिंग करण्यासाठी जागांचा अभाव असल्याने हा विषय मी डीपीडीसी च्या बैठकीत मांडला होता. याची दखल घेऊन पाचोरा शहरात निर्माण होणाऱ्या मार्केटिंग मार्ट साठी दिड कोटींची मंजूरी मिळविली आदीं येत्या आठ दिवसात त्याचे भूमिपूजन करणार असून एक ते दीड वर्षात मार्केटिंग मार्ट तयार होणार आहे .तसेच बचत गटांच्या माध्यमातून अन्न उत्पादित लोकप्रिय ब्रँड तयार करून देशभरात त्याची लोकप्रियता असेल असा मानस आमदारांनी व्यक्त केला. या कार्यक्रमात आमदारांच्या हस्ते बचत गटांना प्रातिनिधिक स्वरूपात बँकेचे धनादेश, प्रमाणपत्र आणि नगरपालिके तर्फे आलेल्या सर्व महिलांना डसबिन, आंबा व पेरूची रोप वाटप करण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उप मुख्याधिकारी दुर्गेश, सोनवणे, कर निरीक्षक दगडू मराठे, नगर रचना अभियंता भय्यासाहेब पाटील, कर निरीक्षक तुषार नकवाल, रवि पवार, सी सी आय चे श्री. भोळे, प्रकाश भोसले, विलास देवकर, भंडारपाल योगेश रावेरकर, ललित सोनार, भागवत पाटील, श्याम ढवळे, महेंद्र सोनवणे, प्रकाश गोसावी, श्रुतिका धातरक ,प्रियंका म पाडवी, जाधव मॅडम सह सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार श्रीमती वैशाली पाटील यांनी व्यक्त केले.