Akola:शिव शंकर उत्सव मंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त चित्रकला स्पर्धेच्या आयोजन बक्षीस समारंभ संपन्न
अकोला से मोहम्मद जुनैद की रिपोर्ट
शंकर उत्सव मंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा या उद्देशानं मुंबई स्तरीय शालेय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली.
हि स्पर्धा श्रमिक जिमखाना डिलाईरोड येथे रविवार दिनांक ३ मार्च रोजी पार पडली त्यामध्ये जवळपास ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.चित्रकला स्पर्धा तीन गटात घेण्यात आली असुन चित्रकला स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ विजेत्यांना रोख रक्कम, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उत्सव मंडळातील कार्यकर्त्यांनी व मित्र परिवाराने विशेष परिश्रम घेतले.
स्पर्धेतील विजेते
गट क्र. १- ई. १ ली ते ४ थी
प्रथम क्रमांक कु. मल्हार भरत सरवदे
द्वितीय क्रमांक कु. प्रसाद प्रमोद ठोंबरे
तृतीय क्रमांक कु. आरोही प्रवीण धनावडे
प्रथम उत्तेजनार्थ कु. मधुश्री सांगळे
द्वितीय उत्तेजनार्थ कु. शिवांश अमर गुरव
तृतीय उत्तेजनार्थ कु. आराध्या हेमंत जगताप
*गट क्र. २- ई. ५ वी ते ७ वी*
प्रथम क्रमांक कु. समर्थ चव्हाण
द्वितीय क्रमांक कु. रतुल हरिश्चंद्र मांडवकर
तृतीय क्रमांक कु. सई योगेश नागावकर
प्रथम उत्तेजनार्थ कु. तेजस्वी मंगेश गावडे
द्वितीय उत्तेजनार्थ कु. आरोही संतोष लाड
गट क्र. ३- ई. ८ वी ते १० वी
प्रथम क्रमांक कु. जान्हवी महेश खंदारे
द्वितीय क्रमांक कु. सान्वी कमलेश भूमकर
तृतीय क्रमांक कु. आयुष सरदेसाई
प्रथम उत्तेजनार्थ कु. सिद्धक शशिकांत जाधव
द्वितीय उत्तेजनार्थ कु. प्रिशा शशिकांत सुर्वे
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून लाभलेले . मुकुंद सावंत, सुनील नांदगावकर आणि . कापसे.
स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून
. सूरज सावंत
. संदीप शिंदे – शिवसेना शाखाप्रमुख बदलापूर कात्रप
. नितीन शिंदे
. जीवन भोसले
. रवींद्र देसाई
. सत्यवान धुमाळे
हे मान्यवर उपस्थित होते