लायन्स क्लब ऑफ कराड मेन चा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न
Lions Club of Karad Men's induction ceremony concludes with enthusiasm
कराड : विद्या मोरे
कराड येथील लायन्स क्लब ऑफ कराड मेन चा पद्ग्रहण सोहळा नुकताच पार पडला यावेळी नूतन अध्यक्ष म्हणून अजय ओझा यांनी शपथ घेतली तर सचीव पदी श्रीपाल ओसवाल, तर खजिनदारपदी गिरीश शाह यांची निवड करण्यात आली येथील हॉटेल पंकज येथे बुधवारी हा सोहळा पार पडला
या सोहळ्यास ला. राजेंद्र मोहिते, ला. बाळासाहेब शिरकांडे, ला.नरेंद्र रोकडे, ला.ॲड. विजय जमदग्नी, ला.महेंद्र कदम, ला.अनिल कदम,ला. गौरी चव्हाण, ला. विद्या मोरे यांचेसह लायन्स परिवारातील बहुसंख्य सदस्य उपस्थित होते…
यावेळी नूतन अध्यक्ष अजय ओझा बोलताना म्हणाले
लायन्स क्लब ऑफ कराड मेन या सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या क्लबचा अध्यक्ष होण्याची संधी आपण दिली त्याबद्दल सर्व सदस्यांचा मी ऋणी आहे. हा क्लब जरी नवीन असला तरी यातील बहुतांश सदस्य हे 40 वर्षापेक्षा जास्त काळ लायनिझममध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने येत्या वर्षामध्ये मोठे सेवा कार्य उभारण्याचा माझा मानस आहे.त्यासाठी येत्या वर्षांमध्ये प्रांतपाल लायन डॉ .वीरेंद्र चिखले सर यांच्या मार्गदर्शनाने आपण काम करणार आहे. हे करत असताना नीड बेस ऍक्टिव्हिटी वर आमचा जास्त फोकस असणार आहे.
पद प्रदान अधिकारी म्हणून उपस्थित असलेले राज मुछल म्हणाले लायन्स इंटरनॅशनल ही संस्था 214 देशात काम करत असून जगातील 14 लाख सदस्यांपैकी तीन लाख सदस्य भारतातील आहेत.ही सदस्य संख्या आणखी वाढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली तसेच यावेळी त्यांनी संचालक मंडळातील प्रत्येक पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कामाची माहिती दिली. व क्लबच्या सेवा कार्याच्या वाटचालीसाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडावी असे आवाहन केले.
दरम्यान यावेळी माजी प्रांतपाल ला.राज मुछाल, तसेच शपथविधी अधिकारी ला.मंगेश दोशी,रिजन चेअरपर्सन ला.निलम पाटील,झोन चेअरपर्सन ला. वृषाली गायकवाड, माजी प्रांतपाल ला.सुनील सुतार,क्लबचे अध्यक्ष ला.संजय पवार यांचे उपस्थितीत नुतन अध्यक्ष ला.अजय ओझा सेक्रेटरी ला. श्रीपाल ओसवाल खजिनदार ला. गिरीश शहा यांनाही पद प्रदान करण्यात आले.
यादरम्यान क्लबमध्ये नव्याने समाविष्ठ झालेल्या चार सदस्यांचा देखील शपथविधी यावेळी करण्यात आला.