Breaking Jalgaon:गोळीबाराने पाचोरा हादरले,बसस्थानक परिसरात तरूणावर गोळिबार,हल्लेखोरां कडून१२ राउंड फायर,शहराची कायदा सुव्यवस्था वेशीवर

Gunfire shakes Pachora, youth shot at near bus stand, attackers fire 12 rounds, law and order situation in the city is on the verge

पाचोरा (प्रतिनीधी) आबा सूर्यवंशी

शहरातिल गजबजलेल्या बस स्थानक परिसरात आज सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एका २६ वर्षीय तरूणावर एक मोटरसायकलवर आलेल्या दोन इसमांनी गावठी कट्ट्याचे १२ राउंड फायर केले.या घटनेत जखमी झालेल्या तरूणाचा जागीच मृत्यु झाला.घटनास्थळावरून मारेकरी सुसाट वेगिने पसार झाले.घटनेची माहीती मिळताच पाचोरा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेउन परिस्थीती नियंञणात आणली.

याबाबत प्राप्त झालेल्या माहीती नुसार आकाश कैलास मोरे (वय २६) रा.छ.शिवाजी नगर पाचोरा हा तरूण ४ जुलै रोजी सायंकाळी ५:३० सुमारास बसस्थानकावर नातेवाईकांना सोडण्यासाठी गेला होता.दरम्यान आकाश मोरे हा त्यांच्या मोटरसायकलवर बसलेला असतांनाच एक मोटरसायकलवरून दोन अज्ञात इसम आकाश मोरे जवळ येउन गावठी कट्ट्याने आकाशवर १२ राउंड फायर केले.यात कपाळाच्या वरती डोक्याजवळ १,डोक्यावर उजव्या बाजुला १, डोक्याच्या उजव्या बाजुला कानाच्या वरती१,डौक्याच्या मध्यभागी २, डौक्याच्या मागिल बाजुस २ पाठीवर ५ अशा १२ गोळ्या झाडल्या.यात त्या तरूणाचा जागिच मृत्यु झाला.त्याला घटनास्थनावरून तात्काळ पाचोरा ग्रामिण रूग्णालयात उपचारासाठी आणले असता वैद्यकिय अधिकारी डाॅ.अमित साळुंखे यांनी मृत घोषित केले.घटनेची माहीती शहरात वार्‍यासारखी पसरली असता बस स्थानक परिसर व ग्रामिण रूग्णालय नातेवाइकांसह नागरीकांनी गर्दी केली होती.मयत आकाश मोरे याच्या परिवारात वडिल,एक भाऊ आणी एक बहिणी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button