दी कराड अर्बन मध्यवर्ती सहकारी ग्राहक संस्था तर्फे दिवाळीसाठी खास ऑफर्स

कराड – पीयुष गोर.
दि कराड अर्बन मध्यवर्ती सहकारी ग्राहक संस्था तर्फे सर्व खाद्यपदार्थ इमिटेशन ज्वेलरी व इतर सामानावरती दिवाळीनिमित्त भरघोस सूट देण्यात आली यामध्ये विद्यमान संचालक मंडळ जे सन 2023 ते सन 2028 पर्यंत कार्यरत आहे त्यामध्ये प्रामुख्याने सायली समीर जोशी अध्यक्ष जयश्री दिलीप गुरव उपाध्यक्ष व संचालक मंडळामध्ये उल्हास तुळशीराम शेठ, गणपती अनंत मानकर, दत्तात्रय रामचंद्र घोंगडी, अनिल विष्णू आमने, नामदेव रामचंद्र थोरात, सुनील पुरुषोत्तम कुलकर्णी, जयवंत बाळकृष्ण देवकर, भास्कर रमेश जोशी, विनायक धोंडूसा चावडीमणी, शशिकांत यशवंत गोतपागर, मनोज रामदास शिंदे आणि संचालिका मंडळ मध्ये सुरेखा आनंदराव पालकर, सुषमा सुरेश कोळेकर, किशोरी अतुल शिंदे, राजश्री अनिल लाहोटी, शोभा जयवंत सागांवकर हे सर्व कार्यरत आहेत दि कराड अर्बन बाजार मध्ये सर्वसामान जे खाद्यपदार्थासाठी लागते ते खूप चांगल्या प्रकारे साफसफाई करून विकले जाते त्यामुळे ग्राहकाचा उदंड प्रतिसाद त्यांना मिळतो व तिथे मूकबधिर शाळेतील मुखवधिर लोक काम करतात तसेच ज्या लोकांना कोणी काही काम देत नाहीत किंवा ज्या विधवा आहेत किंवा ज्यांचा लग्नानंतर सोडचिठ्ठी झालेली आहे या सर्व बायका तिथे अति प्रामाणिकपणे काम करतात तर चला आपण पण सर्वांना आवाहन करूया की सर्वजण आपल्या कराडच्या अर्बन बाजार मधून सामान घ्यावे व आपली दिवाळी सुख व समृद्धीची करावी या अर्बन बाजार बद्दल मॅनेजर सुतार यांनी खूप चांगल्या प्रकारे सर्व सामाना बद्दल माहिती दिली व त्यांनी सांगितले की आम्ही हे सर्व सामान ना नफा ना तोटा या प्रमाणे विकतो फक्त आपल्याकडे जे गरीब व होतकरू लोक कामाला आहेत त्यांचा पगार निघावा हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे या बाजारतर्फे पैसे कमवायचे नाही



