पाचोरा पीपल्स बँक निवडणूक:पराभव दिसत असल्याने चेअरमन ॲड,अतुल संघवी यांचे कडून जप्तीची कार्यवाही!:डॉ.निलेश मराठे

पाचोरा पीपल्स बँक निवडणूक:पराभव दिसत असल्याने चेअरमन ॲड,अतुल संघवी यांचे कडून जप्तीची कार्यवाही!:डॉ.निलेश मराठे

पाचोरा प्रतिनिधी,आबा सूर्यवंशी )

पाचोरा पिपल्स को. ऑप. बँकेचा जळगांव,धुळे, नाशिक, छ. संभाजीनगर, बुलढाणा या जिल्ह्यात विस्तार झाला असून बँक दिवसेंदिवस आर्थिक आणि सर्वांगीण प्रगतीचे टप्पे ओलांडत आहे. या बँकेची पंचवार्षिक निवडणूक लागली आहे. सद्यस्थितीत बँकेवर चेअरमन ॲड. अतुल संघवी यांचे वर्चस्व आहे. विद्यमान चेअरमन ॲड अतुल संघवी यांच्या सहकार पॅनेलचे नऊ जागा मतदाना पूर्वी बिनविरोध झाल्या आहे.

बँक बिनविरोध निवडणुकला ग्रहण

बँक बिनविरोध होणार होती , पण एकच अपक्ष उमेदवार डॉ .निलेश मराठे यांनी जनरल गटातून उमेदवारी कायम ठेवल्याने बँकेची दहा जागेसाठी निवडणूक होणार आहे. सुमारे १०,६०० सदस्य बँकेचे मतदार असून येणाऱ्या १३ जुलै रोजी मतदान होणार आहे. एका उमेदवारामुळे बँकेच्या बिनविरोध प्रक्रियेला मात्र ग्रहण लागले.

आरोपांचे पलटवार

बँकेचे चेअरमन ॲड. अतुल संघवी आणि अपक्ष उमेदवारी करणारे निलेश विनायक मराठे यांच्यात बँकेच्या संदर्भात पत्रकार परिषद मधून आरोपांचे पलटवार करून आपापल्या भूमिका मांडण्यात आल्या. दोन्ही बाजूने जोरदार प्रचार सुरू करण्यात आला आहे.

बँकेचे मतदान सहा दिवसांवर असताना जप्तीची नोटीस

दि.५ जुलै शनिवार रोजी सायंकाळी विनायक पेट्रोल पंपावर आयोजित पत्रकार परिषदेत उमेदवार निलेश मराठे यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलवली होती.बँकेची निवडणूक अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपली असताना बँकेचे चेअरमन ॲड. अतुल संघवी यांनी माझे सन २०२१ मधील एक न्यायप्रविष्ठ असलेले कर्ज प्रकरण उकरून काढत २०२५ मध्ये माझ्या बँकेकडे तारण असलेल्या मालमत्तेवर तहसीलदार यांचे मार्फत जप्तीच्या कार्यवाहीची नोटीस मला पाठविली आहे. गेल्या चार वर्षांपासून मी कर्ज प्रकरणी न्यायालयीन लढाई माझ्या स्तरावर लढत आहेच. मी बँकेची उमेदवारी करू नये , माघार घ्यावी आणि बँक बिनविरोध होईल अशा प्रयत्नात चेअरमन होते. माझ्या उमेदवारी माघारीसाठी सहकार पॅनलचे प्रमुख आणि बँकेचे चेअरमन यांनी विविध स्तरावर मध्यस्थांमार्फत माझे वर दबाव आणून माझ्या माघारीसाठी भरपूर प्रयत्न केले होते. परंतु मी उमेदवारी करणारच यावर ठाम होतो. मी बँकेची निवडणूक का, कोणासाठी, लढत आहे, बँकेच्या कारभाराची मनमानी, सर्व सामान्य गरीब किंवा गरजू कर्जदारांना दिला जाणारा त्रास, बँकेची नोकर भरती प्रकरणे , सामान्य सदस्यांचा मतदानाचा हक्क काढणे, शेतकरी,लहान व्यावसायिकांना कर्ज नाकारणे अशा विविध समस्या आणि माझ्या उमेदवारी बद्दल भूमिका मी पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमातून बँकेचे मतदारांपर्यंत पोहोचविली आहे.

चेअरमन यांच्या पायाखालची वाळू सरकली

केवळ माझ्या एकट्याच्या उमेदवारी मुळे बँकेची बिनविरोध निवडणूकचे स्वप्न भंगले आहे . चेअरमन ॲड. अतुल संघवी आणि त्यांच्या पॅनलच्या सदस्यांना मतदारांच्या दारा पर्यंत जाण्याची वेळ आली आहे. माझ्या उमेदवारीचा आकस ठेवून चेअरमन ॲड श्री. संघवी यांनी माझ्या मालमत्तेच्या जप्तीच्या कार्यवाही करणे म्हणजे त्यांच्या पॅनल मधील एखादा मोठा सदस्य माझ्या मुळे पराभूत होणार असल्याची भीती त्यांना वाटत असून समोर पराभव दिसत असल्याने त्यांच्या पाया खालची वाळू सरकली असल्याचा जाहीर आरोप उमेदवार डॉ. निलेश मराठे यांनी केला आहे.

मी कार्यवाहीला घाबरणारा नाही !

माझ्या कर्ज प्रकरणी बँकेकडे मी १ कोटी ५६ लाख ६६ रुपये न्यूल अकाउंट मध्ये चार वर्षांपूर्वी भरले असून बँक मला त्या रकमेचे व्याज देखील देत नाही. मी अश्या कोणत्याही कार्यवाहीची नसून कायद्यांनी उत्तरे द्यायला समर्थ आहे. मनात राग आणि आकस ठेवून केलेला हा प्रकार असून मी जिंकलो आहे असे मला वाटते.
या प्रसंगी निलेश मराठे यांचे काका राजेंद्र मराठे, भाऊ सुशील मराठे, चुलत भाऊ हर्षल मराठे,तुषार मराठे आणि कायदेशीर सल्लागार ॲड. शांतीलाल बापू सैंदाने पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button