आषाढी एकादशी निमित्त आ .किशोर आप्पा यांच्या हस्ते महाआरती,पिंपळगाव (हरेश्वर) अंतुर्ली येथे महाआरतीचा सोहळा ! भाविकांच्या उपस्थितीत संतपरंपरेचा जागर
On the occasion of Ashadhi Ekadashi, Maha Aarti by Kishore Appa, Maha Aarti ceremony at Pimpalgaon (Hareshwar) Anturli! Vigil of the saint tradition in the presence of devotees!
पाचोरा प्रतिनिधी ( आबा सूर्यवंशी)
दि. ५ जुलै रविवार रोजी
आषाढी एकादशी निमित्ताने पिंपळगाव हरेश्वर येथील प्रति पंढरपूर येथे आणि अंतुर्ली गावात मोठ्या भक्तिभावात महाआरती पार पडली.
पिंपळगाव हरेश्वर येथे आ . किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते महाआरती
येथील महाआरती आमदार कार्यसम्राट किशोर आप्पा पाटील, खासदार सौ. स्मिता ताई वाघ, माजी आमदार दिलीप वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली. वारकऱ्यांनी ‘ज्ञानोबा माऊली’ आणि ‘जय जय रामकृष्ण हरी’ चा अखंड जयघोष केला.
अंतुर्ली येथे महाआरती
दरवर्षीप्रमाणे सालाबाद प्रमाणे अंतुर्ली गावातील १०० वर्षांची परंपरा असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आमदार किशोर आप्पा पाटील व सौ. सुनीताताई किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
प्रमुख मान्यवर व उपस्थिती
या दोन्ही ठिकाणी भाविकां सह शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील,
बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, शेतकरीसेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील,
जनसेवक बंडू भाऊ सोनार,
अतुल पाटील, स्थानिक पदाधिकारी,कार्यकर्ते, गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विठ्ठल नामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि हरिपाठाच्या अखंड स्वरात, हा भक्तिभावाचा उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने गावागावांतून आलेल्या वारकऱ्यांनी ही परंपरा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. पुढील वर्षीही अशीच भक्ती,श्रद्धा आणि एकोप्याची जाणीव ठेवत परंपरा अखंड सुरू राहो अशी आमदारांनी प्रभू चरणी प्रार्थना केली.