सेंट पॉल्स अकॅडमी हिवरखेड येथील अतीक सर ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने’ सन्मानित
Atiq Sir from St. Paul's Academy Hiwarkhed honored with 'Outstanding Teacher Award'
हिवरखेड (अकोला) – येथील सेंट पॉल्स अकॅडमीचे शिक्षक अतीक सर यांना इंडियन टॅलेंटेड ओलंपियाडतर्फे ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या सन्मानामुळे शाळेतील विद्यार्थी, शिक्षकवर्ग तसेच परिसरातील नागरिकांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
गत पाच वर्षांपासून ओलंपियाड परीक्षेत विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि त्यांच्या यशस्वी कामगिरीमुळे अतीक सर यांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली. विशेष म्हणजे, नोव्हेंबर २०२५ मध्ये मुंबई येथे होणाऱ्या भव्य संमेलनात त्यांना किरण बेदी आणि सायना नेहवाल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या व्यवस्थापन समितीकडून त्यांना विशेष शुभेच्छा देण्यात आल्या. अतीक सर यांनी आपले हे यश शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत तिवारी, उपमुख्याध्यापक निमिता गांधी, तसेच व्यवस्थापन मंडळातील श्री. नवनीतजी लखोटिया, श्री. प्रमोदजी चांडक, लुनकरंजी डागा यांच्यासह सर्व सहकारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना अर्पण केले आहे.
– शोएब खान, अकोट ब्युरो चीफ,