शिक्षण सेवक पद्धत रद्द करा. शिक्षक सेनेच्या मागणी आमदारांना निवेदन
Abolish the Shikshan Sevak system. Statement to MLAs demanding from Teachers' Sena
पाचोरा प्रतिनिधी (आबा सूर्यवंशी)
महाराष्ट्र राज्यात लागू असलेला तीन वर्षांच्या शिक्षण सेवक कार्यकाल पद्धत रद्द करण्यात यावा अशी मागणी शिक्षण सेवकाकडून राज्यभरात होत आहे. याबाबत रविवार रोजी शिक्षण सेवक व शिक्षकांचे हक्कासाठी लढणारी संघटना शिक्षक सेना (शिंदे गट ) यांच्यामार्फत निवेदन आमदार किशोर आप्पा पाटील भडगाव पाचोरा मतदारसंघ यांना देण्यात आले.शिक्षण सेवक पद्धत कार्यकाल मध्ये शिक्षकांना तीन वर्ष अल्प वेतन वर काम करायला भागतो. शिक्षण सेवक ही पद्धत फक्त महाराष्ट्र व गुजरात राज्यात सुरू असून नवीन शैक्षणिक धोरण 2020 चे विरुद्ध आहे कारण की नवीन शैक्षणिक धोरण प्रमाणे संपूर्ण देशात शिक्षण सेवक पद्धत समाप्त करण्याच्या उल्लेख आहे, अशाप्रमाणे निवेदनात सांगण्यात आलेला आहे.ही पद्धत रद्द करून समान काम समान वेतन वर आधारित वेतन व इतर सोयी सुविधा शिक्षण सेवकांनाही मिळावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यात शिक्षण सेवक पद्धत लागू करण्याची वेळ व आताची महाराष्ट्राची स्थिती मध्ये भरपूर फरक असून इतर राज्याची GDP च्या तुलनेत महाराष्ट्र राज्य हे प्रथम आहे. ही पद्धत अन्यायकारी असून, बहुतेक शिक्षण सेवक तीन वर्षाचे कार्यकाल मध्ये दुर्दैवाने मृत्यू झाल्याने त्यांचे कुटुंबीयांना शासकीय लाभ किंवा मदत मिळत नाही. जर हे शिक्षण सेवक इतर शासकीय सेवा प्रमाणे पहिल्या दिवशी पासून कायमस्वरूपी झाले असले होते तर त्यांचे कुटुंबियांना शासकीय मदत व लाभ मिळालेला होता.इतर शासकीय नोकरीच्या तुलनेत शिक्षक नोकरी प्राप्त करण्यासाठी शिक्षकांना CET,TAIT TET सारखे अनेक परीक्षा पास करूनही शिक्षक भरती जाहिरात साठी वर्षानुवर्ष वेळ घालायला लागतो.ज्या कारणाने या पद्धतीमुळे नोकरीला लागणारे शिक्षकांची वय सरासरी तीस वर्षांचे वरती जात आहे. महाराष्ट्र राज्यात सुरू असलेले पावसाळी अधिवेशन विधानसभा गृह मध्ये ही समस्या मांडण्याची मागणी निवेदना द्वारे करण्यात आलेली आहे. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी शिक्षकांची समस्यांना गंभीरता पूर्वक घेऊन दूरध्वनी द्वारे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याशी संवाद साधून चर्चा केली. शिक्षकांचे समस्यांना पाठिंबा देऊन आपल्या मार्फत शिक्षण मंत्री यांना पत्र रवाना केला. निवेदन देत्या वेळी शिक्षक सेना संघटनेचे राज्य प्रतिनिधी श्री महेंद्रसिगं पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष श्री राजेन्द्र पाटील, जिल्हा संघटक श्री विजय ठाकूर, अल्पसंख्याक आघाडी तालुकाध्यक्ष जावेद रहिम, तालुका अध्यक्ष सलमान शौकत,
तालुकाध्यक्ष श्री गणेश पाटील, सरचिटणीस अनिल वराडे, नितीन साळुंखे, जिल्हा उपाध्यक्ष शिक्षक समिती श्री अनिल नत्थु पाटील,ज्ञानेश्वर पाचोळे, दत्तात्रय खैरनार
अल्पसंख्याक भडगाव तालुका अध्यक्ष माजी शेख,वसीम खाटीक,सुफियान रंगरएज,आदि मान्यवर उपस्थित होते