आ. किशोर आप्पा पाटील यांच्या आदेशाने प्रभाग क्र. ८ मध्ये रस्ते काँक्रिटीकरण कामांना गती
By order of MLA Kishore Appa Patil, road concreting work in Ward No. 8 has been accelerated.
पाचोरा (प्रतिनिधी ( आबा सूर्यवंशी)
विकासाच्या दिशा ठरवणारे निर्णय हे केवळ कागदावर नव्हे तर जमिनीवर प्रत्यक्षात उतरले पाहिजेत. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे पाचोरा नगरपालिकेच्या प्रभाग क्र. ८ मध्ये सुरू झालेलं रस्त्यांचे काँक्रिटीकरण. आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या आदेशानंतर प्रभागातील उर्वरित विकासकामांना प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे.
या कामाचा शुभारंभ जनसेवक बंडूभाऊ केशव सोनार यांच्या हस्ते स्थानिक नागरिक, आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत विधिवत पूजापाठ करून करण्यात आली.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्र. ८ मधील रस्त्यांची अवस्था जीर्ण झाल्याने पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य तर उन्हाळ्यात धुळ, खड्डे यामुळे नागरिकांना रोजचा त्रास सोसावा लागत असल्याने या बाबत तक्रारी नागरिकांनी वेळोवेळी मांडल्या होत्या. हे लक्षात घेत आमदार किशोरआप्पा पाटील यांनी तातडीने निर्णय घेऊन विकास निधी मंजूर करून काँक्रिटीकरणाच्या कामाला मंजुरी दिली.
या कामामुळे नागरिकांत समाधान आणि आनंदाचे वातावरण आहे. विशेषतः, जनतेच्या संपर्कात राहून त्यांची गाऱ्हाणी ऐकणारे व कामाला प्राधान्य देणारे बंडूभाऊ सोनार यांच्या कार्यपद्धतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
या निमित्ताने, “माझे काम हीच माझी ओळख” या ब्रीदवाक्याचा प्रत्यय लोकांना पुन्हा आला आहे. केवळ घोषणा नव्हे, तर त्या प्रत्यक्षात कशा उतरतात याचा आदर्श प्रस्तुत काँक्रिटीकरण कामातून दिसून येतो आहे.
स्थानिक नागरिकांनी यापुढील विकासकामांसाठी सकारात्मक सहकार्य द्यावे, अशी अपेक्षा स्थानिक प्रशासन व जनसेवकांनी व्यक्त केली आहे. रस्ते पूर्णतः तयार होईपर्यंत वाहतुकीस मर्यादा राहतील याचीही नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन केले आहे.