नवनियुक्त पोलीस:निरीक्षक राहुलकुमार पवार यांचे पुढे वाढत्या गुन्हेगारीचे आव्हान ?

Newly appointed police officer: Will Inspector Rahul Kumar Pawar face the challenge of increasing crime?

पाचोरा प्रतिनिधी (आबा सूर्यवंशी)

पाचोरा शहर व तालुक्याच्याकडे
कायदा सुव्यव्यवस्थेच्या नजरेतून दृष्टिक्षेप टाकला असता गत काळातील १९८४, १९८६, आणि २०१५ या वर्षांमध्ये या शहरात झालेल्या दंगली आणि किरकोळ घटना वगळता शहर उद्योग, व्यवसायात,शिक्षण, क्रीडा क्षेत्रात सह सर्वागीण प्रगतीत अग्रेसर आहे. शहराची लोकसंख्या आणि विस्तार वाढत असून विविध प्रकारचे नवनवीन उद्योग व्यवसाय पण वाढत आहेत. वाढणारी लोकसंख्या आणि काळाची गरज म्हणून नागरिकांच्या दुचाकी, चारचाकी वाहनांची दिवसेंदिवस भर पडत असल्याने शहराच्या रहदारीवर यंत्रणेवर ताण वाढला आहे.

*सुरक्षित रहदारी, वाढत्या अतिक्रमणांवर पोलिस – नगरपरिषदेने संयुक्त कार्यवाह्या कराव्या!
जेष्ठ महिला, पुरुष नागरिक, शाळा ,महाविद्यालयांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, वाहनधारकांना सुरळीत आणि सुरक्षित रहदरीसाठी , बेशिस्त रहदारीला शिस्त लावणे, पार्किंग व्यवस्थेकडे दुर्लक्ष असल्याने लहान, मोठे वाहनधारक छ. शिवाजी महाराज चौक, नगर पालिकाचौक, स्टेशनरोड, देशमुखवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यांवरील बँका, दवाखाने समोरील रस्त्यांवर, स्टेशनरोड ते छ. शिवाजी महाराजचौक ते जामनेररोड वरील हनुमान मंदिर पर्यंतच्या मुख्य रस्त्यांवर ,भुयारी मार्गावरील भडगांव रोडवरील पोलिस लाइन ते महाराणा प्रताप चौका पर्यंतच्या दोन्ही बाजूने हातगाड्या, दुकानदारांचे वाढत असलेलेअतिक्रमण, रहदारीला अडसर निर्माण करतात. शहरात सर्वत्र वाढत जाणाऱ्या अतिक्रमणावर मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी कार्यवाहीचा हातोडा चालवावा तर बेशिस्तपणे सार्वजनिक ठिकाणी, भर रस्त्यावर कोठेही दुचाकी, चारचाकी वाहन उभे करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाया करण्यासाठी नवनियुक्त पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी कठोर पावले उचलली पाहिजे.

*महाराणा प्रताप चौकातील पोलिस चौकी सुरू करा
भडगावरोड भाग, परिसरात कॉलनी विस्तार वाढत आहे. हा भाग उच्चभ्रू परिसर असून ८० टक्के व्यापारी, नोकरदार, राजकारणी, व्यावसायिक सह शाळा, महाविद्यालये, बस,लक्झरी, स्टॉप, हॉटेल्स ,असे विविध व्यवसाय याच भागात असून सतत वर्दळीचा भाग आहे.या भागात अनेक चैन स्नेकिंग,चोऱ्या होतात जेष्ठ नागरिक यांच्या आणि शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी यांच्या मागे शाळा कॉलेज भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत रोडरोमियो भरधाव दुचाकी वाहने चालवित, कर्कश हॉर्न वाजवीत घिरट्या घालतात. या सर्वांचा बंदोबस्त आणि भविष्यातील अघटीत घटना टाळण्यासाठी येणाऱ्या पोलिस निरीक्षकांनी ही चौकी सुरु करावी अशी नागरिकांची मागणी होत असते.

*शहर शांतताप्रिय मात्र, गुन्हेगारीत वाढ!
पाचोरा शहर व तालुक्यात गेल्या काही वर्षात सर्वच प्रकारच्या अवैध व्यवसायांचा धुमाकुळ सुरू असल्याने कायदा सुव्यवस्था वेशीवर टांगल्याची चर्चा आहे.
गुन्हेगारीला राजकीय पाठबळ मिळत असल्याने शहरात भाईगिरी करणाऱ्यांची , गावठीकट्टे बाळगणाऱ्यांची, अवैध दारू विक्री, खनिज, रेतीचोरी, प्रतिबंधित घुटका विक्रीचा धंदा आणि अन्य बेकायदेशीर व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गेल्या दोन- तीन वर्षात भर चौकामध्ये तलवारी, सुरेचाकू चालवून हाणामाऱ्या, खून आणि आता तर दिवसाढवळ्या गोळीबार होत असल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.

*खाकीचा धाक उरला नाही, नागरिकांच्या प्रतिक्रिया ?
वाढत्या गुन्हेगारीवर
पोलिसांचा धाक उरला नसल्याने शांतताप्रिय नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

*पोलिस निरीक्षकांनी सुरुवातीला तात्पुरत्या कार्यवाह्या करून उपयोग होणार नाही ?
नवीन अधिकारी रुजू झाले की सर्वच प्रकारच्या कार्यवाह्या करून खाकीचा धाक निर्माण करण्याची पध्दत योग्य असली तरी तापुरत्या स्वरूपाच्या कार्यवाह्या न करता गुन्हेगारीचा बीमोड करण्याच्या कठोर कार्यवाह्या कराव्या. काही तत्कालीन अधिकाऱ्यांच्या आर्थिक धोरणांमुळे आणि कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षातून गुन्हेगारी फोफावली असल्याचे नागरिक म्हणतात.

नवीन पोलिस निरीक्षकांच्या कारकिर्दी कडे जनतेचे लक्ष?
शहरात, ग्रामीणभागात हात पाय पसारलेल्या सर्वच प्रकारच्या गुन्हेगारीवर नवीन पोलिस प्रशासन काय? आणि कोणती पावले उचलतात याकडे जनता बघणार असून नवीन रुजू झालेले पोलिस निरीक्षक श्री. पवार यांचे पुढे वाढत्या गुन्हेगारीचे आव्हान मात्र समोर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button