ॲड.अतुल संघवी खोटं बोलून मतदारांची दिशाभूल करीत आहे!

Adv. Atul Sanghvi is misleading the voters by telling lies!

डॉ निलेश मराठे यांचा पलटवार

पाचोरा प्रतिनिधी(आबा सूर्यवंशी

-पाचोरा पीपल्स बँकेच्या निवडणूक मतदान दि.१३ जुलै रोजी होणार आहे. कमी कालावधी असतांना बँकेचे कर्ज आणि उमेदवारी या वरून सहकार पॅनल चे ॲड. अतुल संघवी आणि अपक्ष उमेदवार डॉ. निलेश मराठे यांच्यात शाब्दिक टोलेबाजी ची लढाई सुरू असून दोन्ही बाजूने पत्रकार परिषदेत कागदोपत्री पुरावे दाखवून आरोप ,प्रत्यारोप करून एकमेकांची बाजू मांडली जात आहे.
सोमवारी ॲड. अतुल संघवी यांची पत्रकार परिषद झाल्या नंतर डॉ. निलेश मराठे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या आरोपांना कागदोपत्री पुरावे दाखवून ते खोटं बोलून बँकेच्या मतदारांची दिशाभूल करीत असल्याचे त्यांनी म्हणणे मांडले. तसेच मी माझे कर्ज प्रकरणी बँकेने माझे व्याज ,रक्कम किमी माफ करावी अशी मागणी किंवा पत्र दिले नाही. बँकेची निवडणूक मतदारांना न्याय , बँकेचा पारदर्शक कारभार, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि माझे साठी सन्मानाची असून ॲड. अतुल संघवी यांच्या आरोपांना मतदारही बळी पडू नये असे आवाहन उमेदवार डॉ निलेश मराठे यांनी केले आहे. या प्रसंगी त्यांचे जेष्ठ काका सुरेश मराठे, वडील विनायक मराठे, सुशील मराठे, तुषार मराठे, अमन मराठे, ॲड, बापू सैंदाने, अजय थेटे, आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button