माझा प्रभाग ! माझी जबाबदारी !! शहर मलेरिया मुक्त करण्यासाठी सहकार्य करावे:मुख्याधिकारी मंगेश देवरे
Jalgaon news:My ward! My responsibility!! We should cooperate to make the city malaria free: Chief Minister Mangesh Deore
पाचोरा प्रतिनिधी (आबा सूर्यवंशी)
“माझा प्रभाग, माझी जबाबदारी” या संकल्पनेखाली पाचोरा शहरात मलेरिया मुक्तीची सुरुवात करण्यात आली आहे. शहरात सध्या पावसामुळे मोकळ्या जागेत डबक्यात , रस्त्यांच्या कडेला अथवा इतरत्र पाणी साचत असल्याने तेथे रोगजंतू आणि डासांची निर्मिती होत असल्याने मलेरिया किंवा अन्य साथींच्या आजारांचा आरोग्यास धोका वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने पावसाळ्यात साथींच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी पाचोरा नगरपालिकेने एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.
आमदार कार्यसम्राट किशोर आप्पा पाटील यांच्या आदेशावरून शहरात डास निर्मुलनासाठी मलेरिया नाशक लिक्विड औषधाची फवारणी करण्यात येत आहे.
या उपक्रमासाठी मुख्याधिकारी व प्रशासक मंगेश देवरे, आरोग्य निरीक्षक तुषार नकवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सांडपाणी, साचलेले डबके, पावसामुळे तयार झालेल्या पाण्याच्या ठिकाणी मलेरिया नाशक औषध टाकले जात आहे.
*नागरिकांना आवाहन*
“माझा प्रभाग, माझी जबाबदारी” या भावनेतून प्रभागातील प्रत्येक नागरिकाने आपल्या घराजवळ, कॉलनीमध्ये सांडपाण्याचे डबके, अथवा साचलेले पाणी दिसल्यास नगर परिषदेच्या आरोग्य विभागास कळवावे तसेच
नगरपालिकेने हाती घेतलेल्या “मलेरिया मुक्त पाचोरा” मोहीम सामूहिक संकल्प म्हणून प्रत्येक नागरिकाने पुढे येऊन मदत केली तर आपला प्रभागच नव्हे तर संपूर्ण पाचोरा रोगमुक्त होईल, माझा प्रभाग, माझी जबाबदारी चला,आरोग्यदूत बना! असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक मंगेश देवरे यांनी केले आहे.