आपली पाठशाला” या संस्थे मार्फत श्री संत गणेशनाथ महाराज विद्यालय,दहिवड येथे १० कंप्युटर देण्यात आले
“आपली पाठशाला” या संस्थे मार्फत श्री संत गणेशनाथ महाराज विद्यालय,दहिवड येथे १० कंप्युटर देण्यात आले.श्री राकेश शंकर जाधव व सौ.दिपाली राकेश जाधव यांच्या अथक प्रयत्नांनी “आपली पाठशाला” या संस्थे मार्फत श्री संत गणेशनाथ महाराज विद्यालय,दहिवड येथे १० कंप्युटर देण्यात आले. कॉम्प्युटर शिक्षण तसेच आधुनिक टेक्नॉलॉजीचा समन्वय करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण उत्कर्ष सहजपणे शक्य आहे ही गोष्ट ह्या दानशूर व्यक्तींनी लक्षात घेऊन खूपच महत्त्वपूर्ण अशी सरस्वती सेवा आणि त्या माध्यमाने गरजू विद्यार्थ्यांसाठी उज्वल भविष्याची रूपरेखा जणू साकार केली आहे त्याबद्दल हे सर्व अभिनंदन आणि आदर सन्मान चे अधिकारी आहेत.
श्री गणेशनाथ महाराज स्वस्थान श्री क्षेत्र रामदास पठार. तालुका महाड, जिल्हा रायगड यांच्या वतीने “आपली पाठशाला” या संस्थे चे हार्दिक हार्दिक अभिनंदन. परमेश्वर अशीच सेवा आपणाकडून करुन घेवो ; हीच श्री चरणी प्रार्थना.
श्री गणेशनाथ महाराज विद्यालय हे दहिवड गाव,तालुका महाड, जिल्हा रायगड या ठिकाणी सर्व सोई सुविधा सज्ज असे विद्यालय आहे या विद्यालयाचा दरवर्षी रिजल्ट 100% लागला जातो.
रिपोर्टर प्रकाश नलावडे यांचा रिपोर्ट