Navi Mumbai news:ऐरोली विभागात अवैध बांधकामांवर महापालिकेची धडक मोहीम*
Navi Mumbai :Crackdown on unauthorized construction in Airoli section
नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका विभागामार्फत मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने ऐरोली विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली.नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली कार्यालया अंतर्गत भु.क्र.-टी-226, टी-227, से- 04, ऐरोली, नवी मुंबई येथे श्री. अजय सिंग यांनी बांधकाम परवानगी व्यतिरिक्त अनधिकृतपणे बांधकाम सुरु केले होते.
श्री. अजय सिंग, .क्र.-टी-226, टी-227, से-04, ऐरोली, नवी मुंबई यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामास जी विभाग कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 53 (1अ) / 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आली आहे.
तसेच पाटील ढाबा, से-10, ऐरोली व टर्फ क्लब, से-10, ऐरोली या अनधिकृत बांधकामास जी विभाग कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 55 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेल्या आहेत.
संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वतःहून हटविने आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते.
परवानगी व्यतिरिक्त करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम श्री. सुनिल काठोळे, सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी ऐरोली, यांचे नियंत्रणाखाली तोडक मोहिमेचे आयोजन करुन निष्कासित करण्यात आले.
सदर धडक मोहिमेसाठी जी-विभाग कार्यालयातील अतिक्रमण विभागाचे अधिकारी / कर्मचारी, मजूर 06, जे.सि.बि-01 तसेच अतिक्रमण विभागाचे पोलिस तैनात होते.
यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.



