कजगाव येथील प्रकारास मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा,पाचोरा व्हाईस मीडिया पत्रकारांचे प्रशासनाला निवेदन!

A request to the administration of Pachora Voice Media journalists to file a case against those who beat Pracharas in Kajgaon!

आबा सूर्यवंशी

(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)

कजगाव ता. भडगाव जि. जळगाव येथील दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार दिपक अमृतकर व त्यांच्या पत्नी प्रिया अमृतकर यांना त्यांच्या घरात घुसून १२ ते १५ गुंड प्रवृत्तीच्या इसमांनी अमानुष पणे मारहाण केल्याची घटना घडली आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांवरच अश्या प्रकारचे भ्याड हल्ले होत असल्याने पत्रकार राज्यात सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला आहे . शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या विविध कारवाई संदर्भात पत्रकार बातम्या प्रकाशित करून आपले कर्तव्य पार पाडत असतात. भडगाव तालुक्यात प्रकारास झालेली मारहाण प्रकार अशोभनीय आणि निंदनीय आहे. कजगाव येथील घटनेतील हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करावे. तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. यावेळी पत्रकार नंदकुमार शेलकर , दिलीप परदेशी निखिल मोर, परविन बोरसे संघर्ष न्यूज राहुल महाजन , शेख जावीद लाईव्ह आणि सुरेश तांबे ह्या पत्रकारांच्या सदर निवेदनावर सह्या आहेत. सदर घटनेचा आयडीयल पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अजय मिश्रा, केंद्रीय महासचिव सुर्यकांत कदम, केंद्रीय संपर्क प्रमुख आबा सूर्यवंशी यांनी निषेध व्यक्त केला आहे.

Related Articles

Back to top button