इनरव्हील च्या विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे नेटके आयोजन

इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम च्या वतीने विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर दोन दिवस घेण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूल, करवडी येथील शाळेमध्ये याचे आयोजन करण्यात आले होते. इंटरनॅशनल इनरव्हील ला शंभर वर्षे पूर्ण होत असल्यामुळे या शाळेतील शंभर विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये पहिल्या दिवशी ‘मनाचे व्यवस्थापन’ या विषयावर शिवराज माने यांनी सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये करिअर निवडताना कोणती काळजी घ्यायची याबद्दल ‘करिअर मार्गदर्शन’ व स्पर्धा परीक्षा तसेच शासकीय नोकरीतील संधी या विषयावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे जीवन पवार सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा घेतली.
शिबिरामध्ये ‘सुंदर हस्ताक्षर’ कार्यशाळेचे आयोजन अक्षर गुरु राहुल पुरोहित सर यांनी केले. त्यानंतर शाळेतील मुलींसाठी ‘आरोग्य विषयी काळजी’ या विषयावर डॉक्टर शैलजा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्यासाठी विविध फनी गेम चे आयोजन करण्यात आले होते. त्याचा विद्यार्थ्यांनी आनंद लुटला.
दुपारी सर्व विद्यार्थ्यांबरोबर क्लब सदस्यांनी वनभोजनाचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांबरोबर डबा खाऊन सर्व सदस्यांनी पुन्हा एकदा शाळेचा अनुभव घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी जया सचदेव यांनी ‘योगा व मेडिटेशनच्या’ माध्यमातून विद्यार्थी व विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन प्रात्यक्षिकासह दिले. यामध्ये मुलांनी मनापासून सहभाग घेतला.
सूर्यकांत पानसकर यांनी ‘संभाषण कौशल्य’ विषयी धडे दिले व प्रत्यक्ष विद्यार्थ्यांकडून बोलण्याचे धाडस, संवाद कौशल्य याचे प्रात्यक्षिक करून घेतले. चित्रकलेच्या शिक्षिका संगीता पाटील यांनी चित्रकलेच्या परीक्षांबद्दल संपूर्ण माहिती दिली. व चित्रकलेच्या विविध पैलूंचे मुलांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून चित्रकले विषयीची तयारी करून घेतली.
दुपारी क्लबच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी पौष्टिक आहार भोजन म्हणून देण्यात आला. याचा सर्व विद्यार्थ्यांनी आनंद घेतला.
त्यानंतर मुलांच्या अंगच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये कविता, नृत्य, गाणी, वेगवेगळे खेळ, विनोद याचे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सर्वांसमोर सादरीकरण केले.
यामधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगात असणाऱ्या कलांना वाव मिळाला. त्यांनी अनेक कला सर्वांसमोर सादर केल्या.
यानंतर दोन दिवसाच्या शिबिराचा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम पार पडला. शिबिरात सहभागी झाल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. तसेच विविध स्पर्धांची आकर्षक बक्षीस देण्यात आली. कालिकादेवी पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब मोहीरे ,राजन वेळापुरे,विवेक वेळापुरे अनिता कुंभार, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी क्लब प्रेसिडेंट तरुणा मोहिरे यांनी सर्वांचे स्वागत केले. सेक्रेटरी छाया पवार यांनी दोन दिवसाच्या शिबिराचा आढावा घेतला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. थोरात सर यांनी शिबीराचे आयोजन केल्याबद्दल क्लबला धन्यवाद दिले. शाळेच्या शिक्षिका विद्या चव्हाण ,श्री. वेताळ सर यांनी उपस्थित पाहुणे व क्लबच्या सदस्यांचे आभार मानले. यावेळी विद्या पावस्कर, वृषाली पाटणकर, माहेश्वरीजाधव, पुष्पा चौधरी, सारिका शहा, अपूर्वा पाटणकर, श्रुती जोशी, अंजना माने, दिपाली लोहार, सोनाली पाटील, सुषमा तिवारी, प्राजक्ता देसाई, अश्विनी भंडारे, शिल्पा पवार, निमिषा गौर, अलका शिंदे, मुस्कान तलरेजा,नंदा आवळकर ,सुकेशीनी कांबळे,विजयश्री मोहिते इत्यादी क्लब सदस्यांनी या शिबिरासाठी परिश्रम घेतले.

महाराष्ट्र कराड हुन मुख्य संवाददाता पियुष गोर यांची रिपोर्ट

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button