Akola news:रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ए) पक्षाचे वतीने अकोट शहरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व कार्यकर्ता मेळावा
रिपोर्ट:मोहम्मद जुनेद
अकोट शहरातील सोमवार वेस येथील सम्राट अशोक नगर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे वतीने अकोट तालुका व शहर कार्यकर्ते यांना मार्गदर्शन शिबीर व कार्यकर्ता मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान.दिपकभाऊ निकाळजे,राष्ट्रीय महासचिव डॉ.मोहनलाल पाटील,महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा सुनिता ताई चव्हाण,प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनात सदर मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पंकज पळसपगार हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ठाणे जिल्हा महासचिव व अकोला जिल्हा संपर्क प्रमुख सचिन दादा कोकणे,हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अकोला जिल्हाध्यक्ष अजय प्रभे, महिला जिल्हाध्यक्षा सिमाताई सरदार, जिल्हा उपाध्यक्ष पंजाबराव किर्दक, महिला जिल्हा कार्याध्यक्षा सरीता देवी मनोहर, अकोला तालुका महिला कार्याध्यक्षा अंतकला जुमळे, महिला अकोट तालुका उपाध्यक्षाअनुरिती गुहे,रविता वानखडे, रंजना सरदार हे लाभले होते.यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या समस्या सांगीतल्या त्या सोडविण्यात येतील असे आश्वासन सचिन दादा कोकणे यांनी दिले. या वेळी पक्षात अनेकांनी प्रवेश केला.त्या मध्ये जयराम तेलगोटे,वर्षा तेलगोटे, मंगला तेलगोटे, रविता वानखडे,ताईबाई तेलगोटे, पंकज पळसपगार,रवि उमाळे,कोल्हे ताई,रेखा तेलगोटे, ज्योती तेलगोटे, सखुबाई तेलगोटे, विशाखा थोरात , विमलताई तेलगोटे,संगीता इंगळे,प्रमिला तेलगोटे, वंदना वानखडे यांनी पक्ष प्रवेश केला व अकोट शहराच्या कार्याध्यक्ष पदी राजेश तेलगोटे यांची निवड करण्यात आली.या वेळी पक्षात प्रवेश केला अशा सर्वांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश तेलगोटे यांनी तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन अकोट तालुकाध्यक्ष राजकुमार वानखडे यांनी केले.या कार्यक्रमासाठी असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन सम्राट अशोक नगर येथील कार्यकत्यांनी केले होते.