Akola news”द सक्सेस मंत्रा” चे सातवे पुष्प आस्की किड्स मध्ये संपन्न,प्रसिध्द उद्योजक जितेंद्र चावडा यांचे मार्गदर्शन

महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद
प्रगत व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख प्राप्त करण्यासाठी काही पायाभूत बाबी जसे की, संयम, सातत्य, प्रामाणिकता, जिद्द, चिकाटी, शिल, प्रज्ञा, नाविन्य, कौशल्य, एककेंद्रीकरण ह्या व्यक्तिमत्त्व विकासाला अतिशय महत्वाच्या मानल्या जातात. ह्यामुळे व्यक्तिमत्त्वाला आव्हान पेलण्याची, भितीवर मात करण्याची, स्वयंप्रेरणेची ताकद मिळते. ह्या सर्व सद्गुणांची रुजवण स्वतःमध्ये करून घेण्यासाठी विद्यार्थी अवस्था अतिशय योग्य ठरते. ह्याच बाबींचे अनुकरण करून एक सामान्य विद्यार्थी असामान्य यश प्राप्त करण्याचे सामर्थ्य मिळवु शकतो. व्यवसाय, राजनीती, प्रशासन, शेती, शिक्षण इत्यादी क्षेत्रात प्रगती करण्यासाठीची सुरुवात विद्यार्थी दशेतूनच होते. त्याला संपूर्ण रूप प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने प्रत्येक विद्यार्थ्याने वरील मूल्यांच्या आधारे प्रयत्न करावे असा अनमोल “द सक्सेस मंत्रा” आज आस्की किड्स च्या विद्यार्थ्यांना श्री. जितेंद्र चावडा संचालक विकास इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रिकल वर्क्स, विकास डेकोरेटर्स, विकास रेडिमेड स्टोअर्स आणि द सोलार वर्ल्ड यांनी आज मुलांशी बोलताना दिला.आज आस्की किड्स पब्लिक स्कूल मध्ये “द सक्सेस मंत्रा” चे सातवे पुष्प अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.शाळेच्या प्राचार्य नेहा झाडे यांच्या मार्गदर्शनात “द सक्सेस मंत्रा” चे सहावे पुष्प आज आस्की किड्स पब्लिक स्कूल मध्ये संपन्न झाले.
दर महिन्याला होणाऱ्या सक्सेस मंत्रा या कार्यक्रमाचे या महिन्याचे प्रमुख प्रेरणा स्त्रोत श्री. जितेंद्र चावडा हे होते. चावडा यांनी बोलतांना विशेषतः उद्योजक होण्यासाठी लागणारी कौशल्य आणि त्यासंबंधीची मार्गप्रणाली ह्यावर प्रकर्षाने भाष्य केले.सदर ह्या कार्यक्रमाचे नियोजन वैशाली कुलकर्णी आणि मनिष सरकटे सर यांनी केले होते.यावेळी सक्सेस मंत्रा च्या या कार्यक्रमाला वर्ग ७ ते १० चे विद्यार्थी उपस्थित होते. ह्यावेळी संचलन रमशा महिन आणि गायत्री पाडीया आणि आभार प्रदर्शन लावण्या टापरे हिने केले.सदर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी नवनाथ उबाळे, अरुणा काळे, आणि मयुरी खवले यांनी प्रयत्न केले. यावेळी आस्कीचे संपूर्ण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.