बारामती चा देव हरपला
Navi Mumbai today news
*बारामती… आज तू रडते आहेस*
बारामतीच्या जनतेचा देव हरपला,
बारामतीच्या काळजावर काळाचा घाला पडला,
ज्याच्या छायेत बारामतीत पिढ्या वाढल्या,
आज बारामतीतच त्या छायेचा अंत झाला. 💔😓
ज्या बारामतीच्या मातीत जन्म घेतला,
त्याच बारामतीच्या मातीत शेवटची झोप घेतली.
गोर गरिबांचा आधार होता दादा,
आज बारामती पूर्णपणे अनाथ झाली.
💔😓
नेतृत्व गेलं, पण माणूस मोठा होता,
तो केवळ सत्तेचा नाही, बारामतीच्या मायेचा झरा होता.
सर्वांना पोरकं करून गेला,
बारामतीच्या डोळ्यांत अश्रू,
मनात पोकळी देऊन गेला. 😓💔
नियतीचा खेळ किती निर्दयी असतो,
हे आज बारामतीला पुन्हा कळलं,
ज्या माउलीने जन्म दिला,
तिलाच आपल्या लेकराचा अंत पाहावा लागला…💔😓
आईच्या डोळ्यातलं पाणी,
देवालाही अस्वस्थ करत असेल,
हा दुःखाचा डोंगर,
त्या माउलीला कसा भेडसावत असेल.
राजकारणात आरोप–प्रत्यारोप चालतात,
डाग लावले जातात, नावं पुसली जातात,
माणूस मेल्यानंतरही द्वेष बाळगणं,
हीच का साक्षर बुद्धीची शिकवण?
जनतेचा देव असलेल्या त्या देवमाणसावर,
आजित दादांवर असं भयाण मरण यावं—
याहून मोठं दुर्दैव तरी काय?
बारामती, तू आज अश्रूंनीच न्हावून निघालीस…
खरं जिव्हेत असणारा गोडवा आणि कणखर बाणा अश्या सुंदर व्यक्तिमत्व असणाऱ्या दादांना आज मनपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली,🙏🏻💔😓



