Akola news:अॅड. आंबेडकर यांच्यावतीने विधान भवनावर धडक मोर्चा

महराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद

अकोट वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वात २० जुलै रोजी विधानसभेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. गायरान जमिनीचे कायदेशीर पट्टे मिळवून देण्यासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चात वंचित बहुजन आघाडीच्या‌ कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी अधिकाधिक संख्येत सामील व्हावे, असे आवाहन अकोट तालुकाध्यक्ष चरण इंगळे यांनी केले आहे.

यामध्ये शासकीय गायरान जमिनी, महसूल जमिनी, अतिक्रमण धारकांच्या नावे नियमाकुल करणे, गायरान धारक भूमिहीनांच्या शेतीचा सातबारा मिळणे, बेघर, अनुसूचित जाती- जमाती आदिवासी भटके भमिहीनांना घरकल योजनेचा लाभ देऊन सरसकट सातबारा मालकी हक्काचा करणे या मागणी संदर्भात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्या लोकांनी गायरान जमिनी संपादित केलेल्या आहेत, मात्र अद्यापही त्यांना जमिनीचे पट्टे मिळालेले नाहीत. ज्या लोकांनी गायरान जमिनी संपादित केलेल्या आहेत. परंतु अद्यापही त्या लोकांना अजूनपर्यंत वाहिवाटिस असलेल्या जमिनीचे पट्टे मिळालेले नाहीत, त्या सर्व जमिनधारकांनी नाव गटनंबर, , गावाच्या नावासाहित व संपादित केलेले क्षेत्र याची माहिती संबंधीत वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्षाकडे द्यावी. येत्या २० जुलै रोजी मोर्चात शेतजमीन व अतिक्रमण धारकांनी सामील व्हावे, असे आवाहन तालुका अध्यक्ष चरण इंगळे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button