अमरावती:ब्रह्मणवाड़ा थड़ी ग्राम पंचायत समोर आम आदमी पार्टी चे दान पेटी लगावो आंदोलनाचा इशारा
अचलपुर , सैयद गनी की खास रिपोर्ट
अचलपुर, अमरावती महाराष्ट्र
चांदूर बाजार तालुका ची ग्राम बातमी प्रकाशित
दि.१२ जानेवारी:- स्थानिक ब्राह्मणवाडा थडी येथील ग्रामपंचायत मध्ये आम आदमी पार्टी चे शाखा अध्यक्ष अरर्शौदीन इनामदार यांनी वारंवार प्राथमिक आरोग्य केंद्रात पिण्याच्या पाण्याची सोय नाही असे निवेदन दिले आहे परंतु ब्रा.थडी ग्रामपंचायत पाणी पुरवठा विभाग मात्र उडवाउडवीची उत्तरे देऊ वेळ मारुन नेता निदर्शनास आले आहे मात्र हा प्रश्न आता पंचायत समिती प्रशासना कडून जिल्हा परिषद अमरावती मुख्याधिकारी यांच्या दालनात पोहचला आहे अशी विशेष सुत्रांकडून माहिती आहे.
आम आदमी पार्टी चे शाखा अध्यक्ष अरर्शौदीन इनामदार हे आपल्या गावातील नागरिकांच्या समस्यांना तोंड फोडण्यासाठी सदा अग्रेसर असतात मात्र स्थानिक राजकीय षडयंत्र मुळे यांची जनसामान्यांच्या प्रश्नांना वाच्यता ही राजकीय नेते खंडित करत असल्याचे निदर्शनास येत आहे तरी आपल्या सहकार्यातील मित्राच्या मदतीने पुन्हा हा एक नवीन पायंडा आहे की ग्रामपंचायत प्रशासना कडे निधी उपलब्ध नाही तर ग्रामपंचायत ब्राम्हणवाडा थडी पुढे दानपेटी लगावो आंदोलन सुरू करून नागरिकांच्या लोक वर्गणीतुन प्राथमिक आरोग्य केंद्र ब्राह्मणवाडा थडी येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे एक धाडस या ठिकाणी दिसून येते आहे.