नवी मुंबई महानगरपालिकेने सहकार्याची भावना ठेवावी सकल मराठा समाज नवी मुंबईची अपेक्षा
नवी मुंबई डॉक्टर नितीन शिंदे यांचा रिपोर्ट
जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणा साठी आरपारच्या लढाईसाठी मुंबईकडे कूच केले असून त्यांचा विराट असा मोर्चा 26तारखेला मुंबईला पोहोचणार आहे. तत्पूर्वी 25 तारखेला त्यांचा शेवटचा मुक्काम नवी मुंबई येथे आहे.सकल मराठा समाज नवी मुंबई या दृष्टीने कामाला लागला आहे. करोडोंच्या संख्येने येणाऱ्या समाज बांधवांच्या सोयीसाठी मराठा क्रांती मोर्चा नवी मुंबई यांच्यामार्फत राहण्याची खाण्याची तसेच गाड्या पार्किंगची तयारी युद्ध पातळीवर चालू आहे. स्थानिक प्रशासनासोबत सुद्धा त्यांचा पत्रव्यवहार चालू असून आम्हाला सहकार्य करावी अशी हा समाज आशा बाळगून आहे. चालत येणाऱ्या माता भगिनींच्या सेवेसाठी डॉक्टरांची टीम येथे उपलब्ध राहणार असून सर्व औषधे त्यांना मोफत पुरवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर एपीएमसी मधील सर्व जागा राहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परंतु नवी मुंबई महानगरपालिकेकडून म्हणावा असा प्रतिसाद मिळत नसल्याचे सकल मराठा समाजाच्या नवी मुंबई समन्वयकांनी यावेळी सांगितले. तसेच लवकरच आम्हाला त्या दृष्टीने चांगले सहकार्य मिळेल अशी आशा सुद्धा व्यक्त करण्यात आली. करोडो मराठा बांधव पुढील दोन दिवसात नवी मुंबईत दाखल होत असून त्यांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी नवी मुंबई कार्यकारणी युद्ध पातळीवर काम करत आहे. सिडको तसेच महानगरपालिकेच्या ताब्यातील सर्व मोकळी मैदाने यासाठी उपलब्ध व्हावी अशी मागणी या प्रसंगी करण्यात आली. जरांगे पाटलांच्या या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी च्या आरपारच्या लढाईत आम्ही सुद्धा तितक्याच ताकदीने उभे राहून त्यांना साथ देऊ अशीच ग्वाही या निमित्ताने नवी मुंबई सकल मराठा समाज देउ पाहत आहे.