पुणे:पुण्यातील नांदेड सिटी येथे श्री स्वामी समर्थ महिला बचत गटाचा हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न
धायरी पुणे : या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सखी मंचच्या महाराष्ट्राच्या संघटक व भारतीय मिडिया फाउंडेशन महाराष्ट्र सचिव सामाजिक कार्यकर्त्या स्वाती मोराळे व अर्चना ढेंणे या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्या स्वाती मोराळे व अर्चना ढेंणे यांचे स्वागत बचत गटाचे अध्यक्ष मनिषा स्वामी, कोषाध्यक्ष नंदिनी दळवी, सचिव गीतांजली हुकिरे यांनी त्यांचे बुके देऊन स्वागत केलं. या कार्यक्रमांमध्ये स्वाती मोराळे यांनी बचत गटातील महिलांशी संवाद साधला त्या बोलताना म्हणाल्या, की बचत गटाची चळवळ महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असून आपणही त्या चळवळीचा एक भाग आहात तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या पायावरती उभे राहण्यासाठी स्वतंत्र उद्योग सुरू करावेत.
त्यासाठी मी सहकार्य करण्यास तयार आहे शासनाच्या अनेक योजना आपल्यासाठी आहेत . त्या बँकांच्या मार्फत राबवत बँका कर्ज देण्यास टाळात असतील तर आपण जाऊन त्यांना जाब विचारू . आपले काम करुण घेऊत महिलानी कुठे ही घाबरायचे नाही, वेळ पडेल तेव्हा पोलिसांची मदत घ्या. नसेल तर मला फोन करा असे सांगुन महिलानी सामाजिक जीवनामध्ये कसली कुठली ही अडचण आली तर मी आपल्या अडचणीसाठी धावून येईन असा शब्द त्यांनी दिला. आणि यावेळी अर्चना ढेंणे यांनी महिलांना मी तुमच्या सोबत आहे, तुम्ही केव्हाही बोलवा मी येईन असा शब्द देऊन महिलांना उत्साहीत केले . या वेळी वैशाली जोगदंड, वृषाली जोशी यांनी त्यांना काही शंका विचारल्या त्यावर सविस्तर चर्चा झाली. या कार्यक्रमांमध्ये सोनाली घोंगडे, रूपाली कराळे, रंजना सांगवे, जयश्री कापसे, योगिनी कुंटे, वैशाली जोगदंड, वंदना कांबळे, रोहिणी भोसले, रेखा गावडे, लक्ष्मी सोनटक्के, लक्ष्मी कुंभार, अनिता स्वामी, कोमल स्वामी, शारदा जवान, इत्यादी महिला उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मनिषा स्वामी, नंदिनी दळवी, गीतांजली हुकिरे आणि रंजना सांगवे यांनी नियोजन केले.
पुणे महाराष्ट्र से शिवाजी कांबले की रिपोर्ट